आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, भाजपसोबत या : शिंदे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर व रवींद्र फाटक हे ‘मातोश्री’चा निरोप घेऊन मंगळवारी दुपारी ४ वाजता सुरतमध्ये पोहोचले. एकनाथ शिंदे व बंडखोर आमदार ज्या ‘ला मेरिडियन’ हॉटेलमध्ये थांबले आहेत तिथे जाऊन या दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपशी पुन्हा युती करून राज्यात सरकार बनवावे, अशी अट शिंदेंनी नार्वेकरांसमोर ठेवली.
आधी १० मिनिटे ताटकळले, नंतर ४० मिनिटे केली चर्चा
नार्वेकर व फाटक यांना आधी १० मिनिटे हॉटेलबाहेर ताटकळत ठेवले, मग आत प्रवेश दिला. त्यांनी सुमारे ४० मिनिटे एकनाथ शिंदेंशी चर्चा करून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.
उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा; म्हणाले, परत या...
हिंदुत्व हा शिवसेनेचाही मुद्दा असल्याने संपूर्ण शिवसेना पक्ष भाजपच्या पाठीशी उभा करून पुन्हा युतीचे सरकार आणू, असा निरोप उद्धव ठाकरेंनी दिल्याचे नार्वेकरांनी शिंदेंना सांगितले. इतकेच नव्हे तर फोनवरून शिंदेंची उद्धव व रश्मी ठाकरेंशी चर्चाही घडवून आणली. २० मिनिटे ते बोलले. ‘तुमचे व आमदारांचे जे काही प्रश्न असतील ते चर्चा करून सोडवू, आधी परत या,’ असा आग्रह ठाकरे दांपत्याने शिंदेंना केल्याची माहिती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.