आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shipyard Case Complaint Of Audit Fraud: SBI, Bank Scam Worth Rs 5 Lakh Crore: Congress Alleges | Marathi News

शिपयार्ड प्रकरण:ऑडिटमध्ये फसवणूक झाल्याचे कळताच तक्रार : एसबीआय, बँक घोटाळा 5 लाख कोटी रुपयांचा : काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टेट बँक ऑफ इंडियासह २८ मोठ्या बँकांना २२ हजार ८४२ कोटींचा गंडा घालणाऱ्या एबीजी शिपयार्डचे प्रकरण उजेडात येताच एसबीआयने याबाबत तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याच्या आरोपाचा स्पष्ट इन्कार केला आहे. या प्रकरणी सीबीआयने एबीजी शिपयार्ड, कंपनीच्या माजी महासंचालकांसह काही संचालकांच्या निवासस्थानी छापे टाकले आहेत. या कंपनीने बँकांकडून कर्ज स्वरूपात घेतलेली रक्कम इतरत्र वापरल्याचा आरोप आहे. या फसवणूक झालेल्या बँकांत एसबीआयसह आयसीआयसीआयचाही समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसने रविवारी मोदी सरकारवर याबाबत आराेप केले.

भाजप सरकारच्या काळात सात वर्षांत बँकांची सुमारे ५.३५ लाख कोटींची फसवणूक झाली असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसच्या कार्यकाळासह गेल्या ७५ वर्षांतही बँकांची इतकी फसवणूक आणि घोटाळे झाले नव्हते, असा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, काँग्रेसप्रणीत यूपीए काळातच एबीजी कंपनीला कर्ज मिळाले होते, असा दावा भाजपचे प्रवक्ते खासदार सय्यद जफरूल इस्लाम यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...