आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिवरायांना शिवप्रेमी वंदन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांनी वंदन केले आहे. मोदींनी शिवाजी महाराज यांना वंदन करतानाचा एक फोटो देखील ट्विटवर पोस्ट केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे. सत्य आणि न्यायाच्या मूल्यांसाठी उभे राहण्याच्या बाबतीत ते ठाम होते. त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे म्हणत मोदींनी शिवरायांना वंदन केले आहेत. वंदन करताना मोदींनी एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यात मोदी शिवरायांना वंदन करताना दिसत आहे.
तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांनी वंदन केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, वीर, पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो. अहंकार आणि अन्यायाच्या विरुद्ध निडरता हेच सर्वात प्रभावी हत्यार आहे. असे म्हणत राहुल गांधी यांनी शिवरायांना नमन केले आहे.
औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
औरंगाबादेतील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 51 फूट इतकी आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मशाल पेटवत पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर लाइट, कोल्ड फायर अन् फटाक्यांच्या आतषबाजीने पुतळा उजळून निघाला. सुमारे 25 हजार शिवभक्त क्रांती चौकात हजर होते, असा पोलिसांचा अंदाज आहे.
शुक्रवारी सकाळपासून शिवप्रेमींचा जल्लोष सुरू होता. रात्री नऊच्या सुमारास मनपाच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर झाकलेला कपडा काढला तेव्हा या जाणत्या राजाच्या दर्शनाने तमाम शिवभक्त भारावून गेले. घोषणाबाजीला आणखी उधाण आले. पूर्वनियोजनानुसार रात्री 12 वाजताच अनावरण होणार होते. मात्र, प्रचंड रेटारेटी होऊ लागल्याने तासभर आधीच अनावरण करण्यात आले. मान्यवरांची भाषणे, स्वागताला फाटा देण्यात आला, हे या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.