आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shiv Sainik Arrives In Ayodhya Carrying Soil From Shiv Sena Chief Balasaheb Thackeray's Memorial

राम मंदिर भूमिपूजन:अयोध्येत घुमला शिवसेनेचा नारा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरची माती घेऊन शिवसैनिक अयोध्येत दाखल

अयोध्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या राम मंदिराच्या लढ्याचा गोड शेवट उद्या होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्या राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. अवघ्या काही तासांवर हे हा सोहळा येऊन ठेपला आहे. दरम्यान आता अयोध्येत शिवसेनेचाही नारा घुमला आहे. मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष विक्रम प्रताप सिंग हे अयोध्येत दाखल झाले आहेत.

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन विक्रम प्रताप सिंग अयोध्येत पोहोचले आहेत. यानंतर अयोध्येत शिवसेनेचा आवाज घुमल्याचे दिसतेय. शरयू तीरावर ही माती ठेऊन त्यासमोर 492 दिवे लावणार आहेत. शिवसेना हा सोहळा कसा साजरा करणार असा प्रश्न होता. आता शिवसैनिकांच्या माध्यामातून या सोहळ्याला शिवसेनेने उपस्थिती लावली आहे. यावेळी मीरा भाईंदर महापालिका नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष विक्रम प्रताप सिंह यांनी राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपालदास महाराज यांची भेट घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...