आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊत-राहुल गांधी भेट:देशात लोकशाही राहिली आहे का? संजय राऊतांचा संतप्त सवाल; राहुल गांधींच्या भेटीवरही केले भाष्य

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही सदिच्छा भेट होती. आम्ही बऱ्याच मुद्द्यावर चर्चा केली आहे.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आज काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. राजधानी दिल्लीमध्ये या दोघांची भेट झाली. यावेळी राऊत आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. यानंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान देशात लोकशाही राहिली आहे का? असा संतप्त सवाल देखील राऊतांनी केला आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'देशात लोकशाही राहिली आहे का? लोकशाही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. तसेच राहुल गांधींसोबत झालेल्या चर्चेविषयी बोलण्याचे राऊतांनी टाळले आहे. ते म्हणाले की, ही सदिच्छा भेट होती. आम्ही बऱ्याच मुद्द्यावर चर्चा केली आहे. काँग्रेसबाबत काही मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. राहुल गांधी हे महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत. मात्र चर्चेतील सर्वकाही बाबी सांगता येऊ शकत नाहीत. त्या चार भींतीतल्याच असतात, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

लखीमपूर घटनेवर काय म्हणाले होते राऊत?
'हरियाणात शेतकऱ्यांवर हल्ले झाले. त्यानंतर लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना मारुन टाकण्यात आले. जर तुम्ही (पंतप्रधान मोदी) शेतकऱ्यांवर प्रेम करत असाल तर बोलायला हवे. पुढे बोलताना ते म्हणाले की, लखीमपूर खेरीमध्ये जे घडले त्यामुळे संपूर्ण जग दुखावले आहे.' पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मोदी सरकारने शेतकऱ्यांची माफी मागायला हवी. हे काही रामराज्य आहे का? तुम्ही माफी मागत आहात का? येथे शेतकऱ्यांना चिरडण्याचा विषय आहे. यावर माफी मागायलाच हवी. देशात अघोषित आणिबाणी सुरू आहे. मात्र शेतकरी, जनता लढत राहतील' असेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...