आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हत्या:शिवसेनेच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या, बचावासाठी आलेल्या पत्नी आणि मुलीलाही केले जखमी

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशात शिवसेनेचे माजी प्रमुख रमेश साहू यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. आरोपींनी रमेश साहू यांची पत्नी व मुलीलाही जखमी केले आहे. ही घटना घडवून आणल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर पोलिस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत.

इंदूरजवळील उमरी खेडा येथे मध्य प्रदेश शिवसेनेचे माजी प्रमुख रमेश साहू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. उमरी खेड्यात रमेश साहू साई राम ढाबा चालवायचे. रमेश साहू यांना अज्ञात इसमांनी गोळ्या घालून ठार केले. दरम्यान, बचावासाठी आलेल्या साहूंच्या पत्नी आणि मुलगी यांनाही दुखापत झाली आहे. यामध्ये त्या दोघीही जखमी झालेल्या आहेत.

दरम्यान घटनास्थळावरून कोणतीही वस्तू किंवा पैसा चोरीला गेलेले नाही. आरोपींनी केवळ हत्येची घटना घडवून आणली आहे. यामुळे पोलिस घटनेमागील जुन्या धाग्या दोऱ्याचा शोध घेत आहेत. घटनेनंतर रमेश साहूचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे.

10 पेक्षा जास्त वर्षे प्रदेश प्रमुख

मध्य प्रदेशात रमेश साहू हे 10 पेक्षा जास्त वर्षांपासून शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. या प्रकरणात अज्ञात दुचाकीने खंडवा रोड येथील शिवसेनेचे माजी प्रदेशप्रमुख रमेश साहू यांच्या ढाब्यावर पोहोचले आणि त्यांनी शिवसेनेच्या माजी प्रदेश प्रमुखाची हत्या केली. हत्येनंतर आरोपी पळून गेले.