आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या दौरा:शिवसेनेचे अयोध्येतील बॅनर्स हटवले, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची कारवाई

अयोध्या2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे अयोध्येतील बॅनर हटवण्यात आले आहेत. अयोध्या प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यांच्या आधी हे बॅनर लावण्यात आले होते. यावर असली आ रहे है, नकली से सावधान अशा आशयाचा मजकूर होता.

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याआधी शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. अयोध्येत शिवसेनेने बॅनर लावून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'असली आ रहा है, नकली से सावधान!' अशा आशयाचा बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आले होते. 10 जूनला आदित्य ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर असणार आहे.

शिवसेनेची मनसेंवर जहरी टीका

गेली काही दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्ववादी भूमिका घेत शिवसेनेला कोडींत पकडले आहे. यानंतर राज ठाकरेंनी अयोध्येचा दौरा करणार असल्याचेही सांगितले होते. आणि त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौरा घोषित केला आहे. तर अयोध्येत शिवसेनेकडून बॅनरबाजी करत राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला होता. यानंतर आज अयोध्या प्रशासनाने कारवाई करत बॅनर्स काढले आहेत.

मनसेचे शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर

मनसेकडून देखील शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. "राज ठाकरेंचे हिंदुत्व हे सोन्यासारखे खरे" असल्याचे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटले आहे. कोण असली कोण नकली हे अवघा देश पाहत आहे, असे म्हणत किल्लेदार यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरेंच्या दौऱ्याला भाजप खासदाराचा विरोध

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषणसिंह यांचा विरोध आहे. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागावी आणि मगच अयोध्येत यावे असे भाजप खासदारांनी म्हटले आहे. यावर बोलताना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, खासदार ब्रिजभूषणसिंह यांचे ते मत वैयक्तिक आहे. ती पक्षाची भूमिका नाही. तरीही पक्ष त्यांना समज देईल आणि आमचा राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ​​

बातम्या आणखी आहेत...