आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवकाशी:फटाका उद्योगाचा 6 हजार कोटींचा व्यवसाय संकटात; फटाक्यांचा साठा आहे, पण खरेदीदार नाहीत

शिवकाशी / रामकुमार आर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूतील शिवकाशी शहर देशाचे ‘फायरवर्क्स सिटी’ नावाने प्रसिद्ध आहे. येथील प्रत्येकच कुटुंब सणांच्या आनंदात आपले योगदान देते. देशातील ९०% फटाके याच शहरात तयार होतात. शिवकाशीत १,०७० नोंदणीकृत आणि तेवढ्याच अनोंदणीकृत युनिटमध्ये फटाके तयार केले जातात. यात ८ ते १० लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. दिवाळीला १५ दिवस उरले आहेत. परंतु या वेळी फटाके निर्मात्यांत पहिल्यासारखा उत्साह नाही. डीलर्सकडे मोठ्या प्रमाणात साठा पडून आहे. अनेक निर्मात्यांनी ५० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटवले आहे.

तिरुमुरुगन फायरवर्क्सचे मुरुगेशन यांनी सांगितले, ‘तीन वर्षांपासून दिवाळीत फटाक्यांवर बंदी आली आहे. अनेक निर्माते आणि डीलरकडे मोठ्या संख्येने फटाके शिल्लक आहेत. दिल्ली आणि एनसीआरमध्ये फटाक्यांवर बंदी लावली आहे. शिवकाशीचा फटाके उद्योग सुमारे ६ हजार कोटी रुपयांचा आहे. यात दिल्ली आणि एनसीआरची सुमारे १५% म्हणजे ९०० कोटी रुपयांची भागीदारी आहे. मोठ्या कंपन्या तर कोरोनापूर्वीसारखी फटाके निर्मितीची जोखीम घेत आहेत. परंतु छोटे आणि मध्यम युनिट एकूण क्षमतेच्या ५०% काम करत आहेत.

सरकारने मदत केल्यास चीनच्या बाजाराला बसणार धक्का
फटाका उद्योगाच्या पुनरुज्जीवनाबाबत चेन्नईचे प्रसिद्ध अर्थशास्त्र तज्ज्ञ गोपालकृष्णन म्हणाले की, ‘शिवकाशी गेल्या दशकापासून पीडित आहे. पर्यावरणवाद्यांनी संपूर्ण उद्योगालाच न्यायालयीन लढाईत खेचले आहे. कोणतेही सरकार फटाका उद्योगाच्या मदतीला समोर आले नाही. ना कोणी शिवकाशीच्या निर्यात बाजाराला पुढे नेण्यात मदत केली नाही. एक्स्पोर्ट मार्केटवर सध्या चीनचा कब्जा आहे. चीन वर्षाला ६-८ हजार कोटी रुपयांच्या फटाक्यांची निर्यात करते. जर सरकारी स्तरावर शिवकाशीला मदत झाली तर ती चिनी बाजारालाही धक्का देऊ शकते.’

जितकेे फटाके वर्षभरात विकले जातात तेवढे एकट्या दिवाळीत
फेडरेशन ऑफ तामिळनाडू फायरवर्क्स ट्रेडर्सचे जनरल सेक्रेटरी एन. एलंगोवन यांनी सांगितले, ‘आम्ही विक्रीसाठी दिवाळीवर विसंबून असतो. प्रत्येक वर्षी सुमारे ३,५०० कोटी रुपयांचे फटाके तयार करतो. यातील एकट्या दिवाळीत ८० % विक्री होते. ’ प्रमुख फटाके निर्माते व्ही. व्ही. मॅन्युफॅक्चरिंगचे मालक वेलमुरुगन म्हणाले, ‘ या वेळीही अनिश्चितता आहे. मोठे ऑर्डर रद्द होत आहेत. ज्या वितरकांनी अॅडव्हान्स पैसे दिले होते तेही फटाके घेत नाहीत. किती राज्यांत फटाके फोडण्यास परवानगी आहे, हे माहीत नाही.

मागील वेळी ७ राज्यांत होती बंदी, या वेळी उत्पादन ४५% कमी
तामिळनाडू फायरवर्क्स अँड अमोर्सेस मॅन्युफॅक्चरर्स असो.चे (टनफामा) अध्यक्ष गणेशन पंजुराजन यांनी सांगितले, ‘मागील वर्षी सात राज्यांत फटाके विकले नव्हते. त्यामुळे या वेळी उत्पादनात ४५% कपात करण्यात आली आहे. आम्हाला मोठा नफा नकोय. पण या संकटाच्या काळात उद्योग टिकला पाहिजे. मागील वर्षी महामारीदरम्यान सुप्रीम कोर्टाने ग्रीन नसलेल्या फटाक्यांवर बंदी घातली होती३ नंतर ७ राज्यांनी फटाके फोडण्यावर बंदी घातली. कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही ग्रीन फटाकेच बनवत आहोत. आम्हाला वाटते की उत्सवादरम्यान काही तास तरी लोकांना फटाके फोडू द्यावेत.’

बातम्या आणखी आहेत...