आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shivling Found In Pool Of Gyanvapi Mosque, Court Seals Shivling Is Said To Be 3 Feet

ज्ञानवापीत सत्‍यम शिवम सुंदरम:ज्ञानवापी मशिदीच्या कुंडात शिवलिंग मिळाल्याचा दावा, कोर्टाने केले सील

वाराणसी/लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात व्हिडिओग्राफी सर्व्हे पूर्ण करण्यात आला. मशिदीच्या प्रांगणात वजू करण्याच्या ठिकाणी असलेल्या एका कुंडात शिवलिंग मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. हिंदू पक्षाने सोमवारी त्याची माहिती कोर्टाला दिली. त्यावर दिवाणी न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांनी शिवलिंग असलेले स्थान सील करून त्याची सुरक्षा जिल्हा प्रशासन, सीआरपीएफकडे सोपवली. ही माहिती अलाहाबाद हायकोर्टालाही देण्यात आली, तेथे त्यावर सुनावणी झाली. दुसरीकडे सर्व्हे थांबवण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर मंगळवारी सुनावणी होऊ शकते.

काही महिलांनी काशी विश्वनाथ मंदिराच्या अगदी बाजूला असलेल्या मशिदीच्या बाहेरील भागात पूजा करण्याची परवानगी देण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने सर्व्हेचा आदेश दिला होता. कोर्ट कमिशनरने तीन दिवस एकूण साडेअकरा तास मशीद परिसराचा सर्व्हे केला. सर्व्हे टीममध्ये सहभागी हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन यांनी शिवलिंग मिळाल्याची माहिती दिली. त्यावर न्यायाधीशांनी ते स्थान सील करण्याचा आदेश दिला. वकील विजय सिंह यांनी सांगितले की, सर्व्हेत तीन फूट उंच दगड मिळाला. मुस्लिम पक्ष त्याला कारंजा म्हणत आहे, पण तो व्यवस्थित स्वच्छ केला तेव्हा शिवलिंग निघाले. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य म्हणाले की, बुद्धपौर्णिमेला ज्ञानवापीत बाबा महादेवांच्या प्रकटीकरणाने सनातन परंपरेचा पौराणिक संदेश दिला आहे. पद्मभूषणने सन्मानित प्रा. देवीप्रसाद द्विवेदी म्हणाले की, ज्ञानवापी हे मंदिर आहे हे आंधळाही चाचपून सांगू शकेल. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून त्याची सविस्तर तपासणी केली जावी.

3. नंदीचे तोंड हे शिवलिंग मिळालेल्या दिशेने
कोणत्याही शिवमंदिरात नंदीचे तोंड शिवलिंगाकडे असते. काशीत हे शिवलिंग सापडलेल्या दिशेनेच आहे.

बातम्या आणखी आहेत...