आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shivraj Singh Chouhan Ministers List | Shivraj Singh Chauhan Madhya Pradesh (MP) Cabinet Expansion Live Updates: Jyotiraditya Scindia, Gopal Bhargava, Vishwas Sarang, Rameshwar Sharma

मध्य प्रदेश:मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार; शिंदे गटातून 9, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या 3 जणांना मंत्रिपद

भोपाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय जनता पक्षाचे 16 मंत्री, यात 7 जुने तर 9 नवीन चेहऱ्यांना संधी
  • शिंदे गटातून 9 आणि काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या तिघांना मंत्रीपद

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि शपथविधीचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. यामध्ये मध्य प्रदेशच्या राज्यपालांचा अतिरिक्त पदभार सांभाळलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी 28 जणांना मंत्रिपदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. या 28 जणांमध्ये 20 कॅबिनेट तर 8 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. कार्यक्रमापूर्वीच मुख्यमंत्री शिवराज यांनी ही यादी राज्यपालांना दिली. शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा हा विस्तार असला तरीही यात ज्योतिरादित्य शिंदे यांचाच दबदबा पाहायला मिळाला.

भारतीय जनता पक्षाचे 16 मंत्री, यात 7 जुने तर 9 नवीन चेहऱ्यांना संधी

1. गोपाल भार्गव 2. भूपेंद्र सिंह 3. यशोधरा राजे शिंदे 4. विजय शहा 5.जगदीश देवरा 6. बृजेंद्र प्रताप सिंह 7. विश्वास सारंग 8. प्रेम सिंह पटेल 9. इंदर सिंह परमार 10. उषा ठाकूर 11. ओम प्रकाश सकलेचा 12. भारत सिंह कुशवाहा 13. रामकिशोर कांवरे 14. मोहन यादव 15. अरविंद भदौरिया 16. राम खिलावन पटेल

शिंदे गटातून 9 आणि काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या तिघांना मंत्रीपदे गटातून

1. महेंद्र सिंह सिसोदिया 2. प्रभुराम चौधरी 3. प्रद्युम्न सिंह तोमर 4. इमरती देवी 5. राज्यवर्धन सिंह 6. ओपीएस भदौरिया 7. गिर्राज दंडोतिया 8. सुरेश धाकड (राठखेडा) 9. बृजेंद्र सिंह यादव

काँग्रेसमधून भाजपात आलेले

1. हरदीप सिंह डंग 2. बिसाहूलाल सिंह 3. एंदल सिंह कंसाना

मध्य प्रदेशात सलग तीनदा मुख्यमंत्री पद मिळवल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांना काँग्रेसने पराभूत केले होते. कमलनाथ यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले. परंतु, ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या 6 मंत्र्यांसह 22 आमदारांचे समर्थन काढून घेतल्याने 20 मार्च रोजी कमलनाथ सरकार कोसळले होते. यानंतर 23 मार्च रोजी भाजपचे शिवराज सिंह चौहान यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या 28 दिवसानंतर 5 मंत्र्यांच्या मिनी कॅबिनेटने 21 एप्रिल रोजी शपथ घेतली होती. शिवराज यांच्या नेतृत्वात स्थापित झालेल्या मध्य प्रदेश सरकारचा हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार ठरला आहे. तरीही यात काँग्रेस सोडून भाजपची वाट धरलेल्या ज्योतीरादित्य शिंदे यांचाच दबदबा दिसून आल्याने शिवराज यांचच्यात नाराजी दिसून आली. मंत्रिमंडळ विस्ताराच्या एका दिवसापूर्वी त्यांनी अमृत मंथन होणार आणि यातून निघणारे विष शिवला प्यावे लागेल असे सूचक विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना हे विष त्यांना रोज प्यावे लागेल असे काँग्रेस नेते कमलनाथ यांनी म्हटले आहे.

0