आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी समान नागरी कायद्याचा राग आळवला आहे. त्यांनी 3 दिवसांपूर्वी बडवानीत बोलताना व्यक्तीला एकच पत्नी असावी असे ठाम मत व्यक्त केले. तसेच यूनिफॉर्म सिव्हिल कोडसाठी एक समिती स्थापन करण्याचेही संकेत दिले. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर मंत्री प्रेमसिंह पटेलही बसले होते. चौहान यांचे हे वक्तव्य ऐकताच त्यांचा चेहरा पडला. कारण, पटेल यांना स्वतःच्या 4 बायका आहेत. त्यामुळे आता त्यांच्यापुढे मंत्रीपद वाचवण्याचा यक्षप्रश्न उभा टाकला आहे.
प्रेमसिंह पटेलांना 4 बायका
प्रेमसिंह पटेल बडवानी मतदार संघातून विधानसभेवर पोहोचलेत. ते शिवराज सरकारमध्ये मंत्रीही आहेत. शिवराज यांनी महिलांचे शोषण रोखण्यासाठी एक पत्नीत्वाचा मुद्दा मांडला. पण त्यांचे मंत्री प्रेमसिंह पटेल यांनाच 4 बायका आहेत. त्यांनी 2018 च्या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातही त्याचा उल्लेख आहे. त्यात त्यांनी आपल्या चारही बायकांच्या नावांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात जेव्हा केव्हा यूनिफॉर्म सिव्हिल कोडची चर्चा सुरू होते, तेव्हा आपसूकच या मंत्री महोदयांच्या नावही चर्चेत येते.
मंत्रीपदावर गडांतर येण्याची शक्यता
बडवानीच्या राजकारणावर प्रेमसिंह पटेल यांची चांगली पकड आहे. पक्षात त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदही मिळाले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या पत्नींची नावे असमा, सिरवटी, कमली व कोकीळा अशी आहेत. त्यांच्यापासून पटेलांना 3 मुलेही आहेत. त्यामुळे शिवराज सिंह यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत समान नागरी कायद्याचा मुद्दा उचलला, तर प्रेमसिंह पटेलांच्या मंत्रीपदावर गडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मध्य प्रदेशात गरमागरम चर्चा
मध्य प्रदेशात समान नागरी कायद्यावर गरमागरम चर्चा सुरू आहे. शिवराज सरकार लवकरच हा कायदा लागू करण्याच्या विचारात आहे. यासाठी ते समितीही स्थापन करणार आहेत. दुसरीकडे, विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यासाठी ते प्रेमसिंह पटेल यांचेही नाव घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.