आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मध्यप्रदेशात परत लॉकडाउन होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण, शुक्रवारी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आढावा बैठकीनंतर स्पष्ट केले की, राज्यात पुन्हा लॉकडाउन होणार नाही. फक्त, जिथे कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, त्या परिसरात नाइट कर्फ्यू लागू केला जाईल. हा लॉकडाउन कधीपासून लागू होईल, याबाबत अद्याप कोणतीच माहिती आलेली नाही. गुरुवारी राजधानी भोपाळमध्ये 425 आणि इंदुरमध्ये नवीन 313 रुग्ण सापडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोरोनावर आढावा बैठक बोलवली होती.
नाइट कर्फ्यूवर जिल्हाधिकारी निर्णय घेतील
ज्या शहरात कोरोनाची 5% पेक्षा जास्त पॉझिटिविटी रेट आहे, तिथे रात्री 10 पासून सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल. अशात जिल्ह्यात क्राइसिस मॅनेजमेंट ग्रुपच्या बैठकीनंतर संबंधित जिल्हाधिकारी नाइट कर्फ्यू लावण्यावर विचार करतील.
बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले
राज्यातील शाळा-कॉलेज सध्या बंद राहतील.
सिनेमागृहासाठी आधीची गाइडलाइन जारी असेल. म्हणजेच, 50% सिटिंग कॅपेसिटीची परवानगी असेल.
उद्यापासून प्रत्येकजिल्ह्यात क्रायसिस ग्रुपची रेगुलर बैठक होईल.
संपूर्ण राज्यात मास्क घालणे बंधनकारक केले जाईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.