आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shivsena Kalaben Delkar's Victory In Dadra Nagar Haveli Lok Sabha By election By 50,000

दादरा-नगर हवेली पोटनिवडणुक:शिवसेनेचे दिवाळीला सीमोल्लंघन, दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांचा 50 हजारांनी विजय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात शिवसेनेचे यश पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्राबाहेर महिला खासदार शिवसेनेला मिळाली आहे. दादरा-नगर हवेली या पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना 50 हजारांनी अधिक मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या आहेत. आज निवडणुकीत सुमारे 75.91 टक्के मतदान पार पडले होते.

शिवसेनेने स्व. खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून महेश गावित आणि काँग्रेसकडून महेश धोदी यांनां उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या निवडणुकीत कलाबेन यांचा विजय झाला असून, त्यांना 1 लाख 16 हजार 834 मते मिळाली आहे. तर भाजपला 66 हजार 157 मतांवर तर काँग्रेसला 50 हजार 677 मतांवर समाधान मानावे लागले.

भाजपकडून या निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी प्रचारात सहभाग घेतला.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे दादरा-नगर हवेली येथे पोटनिवडणूक पार पडली होती. यामध्ये भाजप आणि शिवसेनेने चांगली कंबर कसली होती. शिवसेनेने आपला उमेदवार म्हणून स्व. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना घोषित केले होते. तर भाजपने महेश गावित यांना उमेदवारी दिली होती.

बातम्या आणखी आहेत...