आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला पर्याय देणे हाच एकमेव पर्याय:ममता बॅनर्जी असो किंवा राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात - संजय राऊत

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सध्याचा सर्वात मोठा आणि सत्ताधारी पक्ष भाजपला पर्याय मिळावा यासाठी विरोधीक प्रयत्न करत आहेत. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी याविषयावर भाष्य केले आहे. देशातील विरोधकांची एकजूट व्हायला हवी, आणि सर्वांनी आपले मतभेत बाजूला सारुन एकत्र यायला हवे असे मत राऊतांनी व्यक्त केले आहे. तसेच ममता बॅनर्जी असो किंवा राहुल गांधी या सर्वांना केवळ शरद पवार हेच एकत्र आणू शकतात असेही राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांच्या एकजुटीविषयी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, या देशातील सर्व विरोधकांची एकजूट व्हायला हवी. सर्वांनी एकत्र येत आपले मतभेद दूर करायला हवे. तसेच ममता बॅनर्जी असो किंवा राहुल गांधी सर्वांना एकत्र आणण्याचे काम हे केवळ शरद पवारच करु शकतात. तसेच नेतृत्वाचा प्रश्नच नाही. भारतीय जनता पक्षाला पर्याय देणे हाच एकमेव पर्याय असल्याचे देखील राऊत म्हणाले.

राजकारण खूप चंचल आहे
राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आता 2014 मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील असे कोणालाही वाटले नव्हते. पण राजकारण हे खूप चंचल आहे आणि जणता ही शहाणी आहे. आमचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधारी काहीही करु शकतात. मात्र आमचे काम हे सुरु राहणार आहे. विरोधकांना एकत्र आणणे हा काय देशद्रह नाही. ही लोकशाहीचीच पध्दत आहे. तसेच हे मोदींविरोधातील षडयंत्र नाही असेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...