आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shivsena Leader Sanjay Raut Hits Out At Centre Amid Row Over Parliament Female Commandos News And Updates

संजय राऊत भडकले:ही कसली मर्दाणगी? खासदारांना आवरण्यासाठी राज्यसभेत महिला कमांडो तैनात करण्यावरून संजय राऊत संतापले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेत झालेल्या गोंधळावरून विरोधी पक्ष चांगलाच भडकलेला आहे. राज्यसभेत सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी बुधवारी राज्यसभेत महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. त्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राऊत म्हणाले, खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोजना बोलावता ही कसरी मर्दानगी?

'भारत-पाकच्या सीमेवरही असं सैन्य नसेल'

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणालेत की, सभागृहात मार्शल बोलावणे ही काही नवी गोष्ट नाही. विधानसभेत आणि लोकसभेतही कमांडोज बोलावले जातात. पण जणू काही दंगल घडते आणि दंगल अटोक्यात येत नाही, तेव्हा सैन्याला बोलावले जाते तसे बंदुका घेऊन सैन्य बोलावले. भारत-पाकिस्तानच्या सीमेवरही असं सैन्य नसेल.

संसदेत खासदारांसमोर महिला कमांडोज होत्या. नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग अशा महिला कमांडोज घेऊन फिरतो. संसदेतही आम्ही पुढे जाऊ नये म्हणून हे कमांडोज आणले. महिलांना आमच्यासमोर उभे करता ही कोणती मर्दानगी आहे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.

राज्यसभेत नेमकं काय घडलं?
राज्यसभेत रुल बुक फेकले असेल तर याचा अर्थ सरकारने नियमांचं पालन केलं नाही. रुल बुक वाचा आणि संसदेचं कामकाज चालवा यासाठी प्रताप बाजवा यांनी रुल बुक फेकलं असं म्हणणं आहे. कारण नियमानुसार काम चालत नव्हतं. बुधवारी पाच साडेपाच वाजता घटना दुरुस्ती बिलावर शांतपणे, सहमतीने चर्चा सुरू होती. बहुमताने बिल मंजूर करून घेतलं. संपूर्ण विरोधी पक्षाने सहकार्य केलं. मात्र जे इन्श्युरन्स संदर्भातील बिल आहे. विमा कंपन्यांचं खासगीकरण करण्याचं त्याला विरोध आहे. देशभरातून विरोध आहे. ते आज न आणता उद्या आणावं असं काल सकाळी ठरलं होतं. या बिलावर उद्या चर्चा करण्यावर सहमतीही झाली. जेव्हा एसईबीसी बिल मंजूर झालं. तेव्हा लगेच या बिलावर कारवाईला सुरुवात झाली. त्यावर सर्व विरोधक उठले. शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेही उठले. त्यांनी विरोध केला. पण सभागृह नेते पीयूष गोयल आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी हे बिल रेटण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला त्यातून गोंधळ उडाला.

शरद पवारांनीही व्यक्त केली नाराजी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली. 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी कोणत्याही सभागृहात असं चित्रं पाहिलं नाही. हे पवारांसारख्या नेत्याला अस्वस्थतेतून बोलावं लागलं. माझ्याशी बोलले ते. मीडियाशी बोलले. ते फार अस्वस्थ होते. ज्यांनी संपूर्ण हयात संसदीय राजकारणात घालवली आहे ते सर्व नेते अस्वस्थ होते, असंही पवार यांनी सांगितलं.

बातम्या आणखी आहेत...