आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shmashana Ghat And Coronavirus Death; Ten Photos From Bhopal Mumbai Ahmedabad Delhi Indore Pune Surat Varanasi; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 शहरांतील 10 वेदनादायक चित्रे:वृद्ध आईच्या चरणात तरुण मुलाने घेतला अखेरचा श्वास; स्मशानात 24 तास जळत आहेत चिता, कोरोनाचे भयान वास्तव...

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वीलेखक: हिमांशु मिश्रा
  • कॉपी लिंक
  • हा फोटो भोपाळमधील भदभदा स्मशानभूमीतील आहे. जेथे दररोज 100-150 लोकांवर अंत्यसंस्कार केल्या जात आहे. परंतु, सरकारी आकड्यांत संपूर्ण जिल्हात केवळ 10-12 मृतांची नोंद होत आहे.

देशात कोरोना महामारीच्या वाढत्या संक्रमनामुळे मृतांचा आकडादेखील वाढतच आहे. देशातील सर्वच जिल्ह्यात मृतांचा आकडा सरकारी आकड्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त असल्याचे आढळून येत आहे. देशातील विविध स्मशानभूमीत जळणाऱ्या चितांवरुन याचा अंदाजा लावता येऊ शकतो. आमचा हेतू तुम्हाला घाबरवण्याचा नसून जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आहे. देशात कोरोनामुळे मरणाऱ्या लोकांची संख्या आणि सरकारी आकडा यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. दरम्यान, देशातील अनेक स्मशानभूमीतील चिता हे थंड होणाच्या आधीच विझवण्यात येत आहे. कारण, दुसऱ्या चितांवरदेखील अंत्यसंस्कार करता यायला हवे.

या फोटोमध्ये देशातील 10 शहरांतील कोरोनामुळे मरणाऱ्या लोकांचे 10 चित्रे दिसतील. जी तुम्हाला विचलित करु शकतील. परंतु, देशात कोरोना महामारीमुळे किती भवायह परिस्थिती निर्माण झाली आहे याचा अंदाजा येईल. या फोटोंमध्ये तुम्हाला आपण आपले नातेवाईक गमावल्याचे दिसतील. मृत व्यवस्थेसह सामान्य लोकांचा निराश आणि असहाय्य चेहरा दिसेल. या फोटोतील काही चित्रे आपल्याला याची जाणीव करुन देतील की, आपल्याजवळ कितीही पैसा असला किंवा आपण कितीही मोठे असलो तरी... थोडासा निष्काळजीपणा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भारी पडू शकतो.

हा फोटो पंतप्रधान मोदी यांच्या मतदारसंघ वाराणसीतील असून यामध्ये एक वयस्कर महिला आपल्या जवान मुलाला उपचार मिळावे यासाठी वणवण भटकत आहे. परंतु, त्याला रुग्णवाहिकादेखील मिळाली नाही. दुर्दैव असे की, त्या जवान मुलाने शेवटी आपल्या वयस्कर आईच्या पायात आपला शेवटचा श्वास सोडला.

या फोटोतील दृश्य उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील भैसा कुंड स्मशान घाटातील आहे. जेथे एकाचवेळी 184 लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. परंतु, सरकारी आकड्यांत येथे दररोज फक्त 10 मृतांची नोंद होत आहे.

हे फोटो उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील आहे. जेथे कोविड हॉस्पिटलमध्ये दररोज 10-20 लोकांचा मृत्यू होत आहे. परंतु, सरकारी आकड्यांत संपूर्ण जिल्ह्यात 10 ते 15 लोकांचा मृत्यूंची नोदं केली जात आहे.

देशाची राजधानी दिल्लीतही दररोज मृतांचा आकडा वाढत आहे. स्मशानभूमी व्यवस्थापकांचे म्हणणे आहे की, येथे दररोज 50-60 मृतदेह येत आहे. स्मशानभूमीत जागा उपलब्ध नसल्याने ते शहर बाहेरील मोकळ्या जागेत जाऊन अंत्यसंस्कार करीत आहे.

हा फोटो जम्मूतील जिल्हा हॉस्पिटलचा आहे. येथेही मृतांच्या आकड्यांमध्ये 123% ने वाढ झाली आहे. दरम्यान, मृतदेहांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका कमी पडत असून एका रुग्णवाहिकेत 6-7 लोकांचा मृतदेह नेण्यात येत आहे.

हे फोटो गुजरातमधील अहमदाबाद शहरातील आहे. दरम्यान, येथील स्मशानभूमीत दररोज 100-150 लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. येथेही सरकारी आकड्यांत 20-25 मृतांची नोंद होत आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधील दृश असून येथे आहे. कोरोनामुळे जीव गमावलेल्या रूग्णाच्या कुटूंबाला शेवटच्या वेळेस त्याचा चेहरा पाहायला मिळाला नाही. पुन्हा पुन्हा मृतदेह पाहून कुटुंब रडत राहिले.

हे फोटो कर्नाटकातील बंगळुरु शहरातील बोमानहाली घाटावरील आहे. जेथे रुग्णवाहिकेला रांगेत उभे राहावे लागत आहे. दरम्यान, शहरात सरकारी आकड्यांनुसार दररोज 50 ते 70 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. परंतु, वास्तवात 100-200 लोकांवर अंत्यसंस्कार चालू आहे.

बातम्या आणखी आहेत...