आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक सेमीफायनलमध्ये, पण अख्तरचा विश्वास बसेना:दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे पाकला संधी; शोएब म्हणाला -ये कैसे हो गया..'

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशला पराभूत करून पाकिस्तान टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला. करो किंवा मरोच्या या सामन्यात बांगलादेशाने पाकपुढे 128 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ते पाकने 5 गड्यांच्या मोबदल्यात सहजपणे पूर्ण केले. पाकिस्तानतर्फे बाबर आझमने 25, तर रिझवानने 32 धावा केल्या. या सामन्यात शाहीन आफ्रिदीने चमकदार गोलंदाजी करत बांगलादेशचे 4 गडी तंबूत पाठवले. या विजयामुळे पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अख्तरचे मजेदार ट्विट

त्याचे झाले असले की, रविवारी दुबळ्या नेदरलँडने बलाढ्या दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. परिणामी, गुण व रनरेटच्या आधारावर पाकिस्तानचा संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला. या घटनाक्रमानंतर अख्तरने एक ट्विट केले. हे ट्विट पाकच्या बांगलादेशावरील विजयानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले. आपल्या ट्विटमध्ये अख्तरने 'ये कैसे हो गया..' अर्थात 'हे कसे झाले' असे विचारले.

पाकने बांगलादेशाचा 5 गड्यांनी पराभव करून अंतिम 4 संघांत स्थान निश्चित केले आहे. ग्रुप-2 मधील भारत व पाकिस्तान हे 2 संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले. तर ग्रुप-1मधून इंग्लंड व न्यूझीलंड उपांत्य फेरीत पोहोचलेत.

पाकच्या विजयामुळे सेमीफायनलची रंगत आणखी वाढली आहे. आता क्रिकेट रसिकांना तब्बल 15 वर्षांनंतर फायनलचा सामना होण्याची शक्यता आहे. पण यासाठी दोन्ही संघांना आपापला सेमीफायनलचा सामना जिंकावा लागेल.

दोन्ही संघ यापूर्वी 2007मध्ये भिडले होते

2007 च्या विश्वचषकात दोन्ही संघ आपापल्या उपांत्य फेरीतील सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचले होते. सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा तर पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला. यानंतर दोघांमध्ये झालेला अंतिम सामना भारताने 5 धावांनी जिंकला. अशा परिस्थितीत आता दोन्ही संघ फायनल खेळण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...