आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नियंत्रण रेषेवर सातत्याने चकमकी घडू लागल्या आहेत. त्यामुळे भारत व पाकिस्तानने या समस्येतून तोडगा काढावा, असे आवाहन पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. उभय देशांत प्रचंड गोळीबार झाला. त्या पार्श्वभूमीवर मुफ्ती यांनी हे वक्तव्य केले आहे. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री म्हणाल्या, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व तत्कालीन राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी या भागात कोणत्याही प्रकारे युद्धबंदीचे उल्लंघन करायचे नाही, असा करार झाला होता. त्याची आता अंमलबजावणी व्हायला हवी. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन वाढले आहे. म्हणून भारत व पाकिस्तानच्या नेत्यांनी या प्रश्नासाठी राजकीय दबाव वाढवण्यावर भर देणे योग्य ठरणार नाही. त्यासाठी आधीच्या कराराची अंमलबजावणी करणे हितावह ठरेल, असे मुफ्ती यांनी म्हटले आहे. दरम्यान, शुक्रवारी पाकिस्तानच्या लष्कराने नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात ६ नागरिकांचा मृत्यू झाला, तर १२ लोक जखमी झाले.
निष्पाप लोकांचे रक्त सांडणे थांबवा : हुरियत
भारत-पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गोळीबार आता थांबवला पाहिजे. या भागात सतत निष्पाप नागरिकांना प्राण गमावण्याची वेळ आली आहे, असे ह हुरियतने म्हटले आहे. जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चा केली पाहिजे. त्यातूनच हा प्रश्न सुटणार आहे. चर्चेतून तोडगा काढल्यास दोन्ही बाजूने होणारे मानवी मृत्यू थांबवता येऊ शकतील. हा हिंसाचार लवकरात लवकर रोखला गेला पाहिजे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.