आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकारी आणि पोलिसात चकमक:शिकाऱ्यांचा गोळीबार; तीन पोलिसांचा मृत्यू, आरोपीच्या घरावर बुलडोझर

भोपाळ6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात शनिवारी शिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा गोळ्या लागून मृत्यू झाला. तर पोलिसांच्या कारवाईत दोन शिकारीही ठार झाले आहेत. पोलिसांनी प्रत्युत्तर देत गोळीबार केल्याने एक आरोपी ठार झाला तर दुसरा सायंकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ही घटना सागा बारखेडाजवळील साहरोक रस्त्यावर घडली. या परिसरात शिकारी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक त्यांची धरपकड करण्यासाठी गेले असता शिकाऱ्यांनी पोलिस पथकावर गोळीबार केला.

बातम्या आणखी आहेत...