आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shopian Fake Encounter Attempts To Destroy Evidence Of 2 Accused Including Military Captain

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शोपियां बनावट चकमक:लष्करी कप्तानासह 2 आरोपींचा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या आरोपपत्राचा तपशील झाला जाहीर

शोपियांएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या बनावट चकमक प्रकरणात सैन्याचे कप्तान व इतर दोन आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तीन तरुणांकडे असलेल्या शस्त्रांच्या स्रोताबद्दलची माहिती देण्यात आली नाही. जम्मू-काश्मीरच्या विशेष तपास दलाने (एसआयटी) न्यायालयासमोर दाखल केलेल्या आरोपपत्रात हा ठपका ठेवला आहे. आरोपपत्राचा तपशील आता समोर आला आहे.आरोपपत्रात मुख्य आरोपी राष्ट्रीय रायफल्सचे कप्तान भूपेंद्र सिंह यांनी अधिकारी व पोलिसांना चकमकीबद्दलची चुकीची माहिती दिली. शस्त्र जप्त केल्याबद्दलची देखील चुकीची माहिती दिली. या प्रकरणात सैन्याचे कप्तान यांच्याशिवाय दोन नागरिकही आरोपी आहेत. १८ जुले २०२० रोजी शोपियांतील अम्शीपुरामध्ये झालेल्या चकमकीत तीन अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा करण्यात आला होता. त्याचे छायाचित्र जाहीर झाल्यानंतर नातेवाइकांनी प्रश्न उपस्थित केले.

वास्तविक मृत्यमुखी तरुण शोपियांमध्ये मजुरी करत होते. ते दहशतवादी नव्हते, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. तिघेही राजौरी जिल्ह्याचे रहिवासी होते. त्यानंतर सैन्य व पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. चकमकीत सशस्त्र दलाने विशेषाधिकार नियमाचा दुरुपयोग केल्याचा निष्कर्ष सैन्याच्या तपासातून काढण्यात आला. तीनही तरुण निर्दोष होते.पोलिसांच्या आरोपपत्रात आरोपींनी मारलेल्या तरुणांच्या मृतदेहाजवळ शस्त्रे ठेवली हाेती, असे नमूद केले आहे. मात्र शस्त्रांचा स्रोत स्पष्ट नाही. आरोपींनी चकमकीनंतर जाणूनबुजून पुरावे ,गुन्हा दडवला. चुकीची माहिती दिली. २० लाखांचे बक्षीस मिळवण्यासाठी हे कृत्य केले.