आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात विमान प्रवासामध्ये वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये देशांतर्गत मार्गांवर विमानांच्या फेऱ्या फेब्रुवारी २०२२ च्या तुलनेत ४५.८९ टक्क्यांनी वाढून १,७७,७६८ झाल्या. मात्र, देशातील ११ एअरलाइन्स कंपन्यांकडे ७०० विमानेच आहेत, तर गरज आहे १८०० विमानांची. कंपन्यांनी १,११५ विमानांची ऑर्डर दिली आहे. ही विमाने मिळण्यास दोन वर्षे लागतील. विमान नियामक डीजीसीएच्या अहवालानुसार, उड्डाणांना विलंब होत असल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढण्याच्या प्रकरणांमध्ये पाचपटीने वाढ झाली आहे.
फेब्रुवारी २०२३ मध्ये रिफंडचे १.९६ कोटी द्यावे लागले, तर फेब्रुवारी २०२२ मध्ये ३६.७३ लाखांचे रिफंडच जारी करण्यात आले होते. क्षमतेपेक्षा जास्त तिकिटे विकली जात असल्याने तिकीट असूनही विमानामध्ये बोर्डिंग मिळत नसल्याच्या घटना ९२ टक्के वाढल्या आहेत. फेब्रुवारीत स्पाइसजेटमध्ये सर्वाधिक ९४.१% ऑक्युपन्सी होती. स्पाइसजेटमध्ये सर्वाधिक बोर्डिंगला नकार देणारी प्रकरणे घडली.
{काही उड्डाणांना का विलंब होत आहे? अनेकदा तांत्रिक कारणे असतात. मात्र, सध्या ही संचालनाची कारणे आहेत. एअरलाइन्सने नवे मार्ग घेतल्यानंतरही नवे विमान खरेदी केेले नाहीत. अशा वेळी शफलिंगदरम्यान अनेकदा तांत्रिक अडचणी येतात. {तिकिटे असतानाही अनेकदा प्रवाशांना बोर्डिंगसाठी नकार का? कंपन्या क्षमतेपेक्षा जास्त तिकिटे विकत आहेत. यावर कोणतीच बंदी नाही. म्हणून अनेकदा तिकिटे असूनही प्रवाशांना बोर्डिंग करू दिले जात नाही. {काही फ्लाइट्स रद्द होण्याच्या प्रकरणांत तेजी का येत आहे? सामान्यत: छोट्या एअरलाइन्सच्या फ्लाइट्स जास्त रद्द होत आहेत. याचे कारण काही कंपन्यांकडे देखभालीसाठी निधी कमी आहे. तांत्रिक बिघाड झाल्यास विमान वेळेवर दुरुस्त केले जाऊ शकत नाहीत.
दोन मोठी कारणे व त्याचा परिणाम १. मागणी वाढली : तज्ज्ञांच्या मते, फेब्रुवारीत विमान तिकिटांना मागणी वाढली. ९४% पर्यंत बुकिंग झालेली असतानाही काही कंपन्यांनी १०० टक्क्यांपेक्षा जास्त तिकिटांची विक्री केली आहे. परिणाम : अनेक प्रवाशांना बोर्डिंग मिळत नाही. २. मार्ग वाढवले : कंपन्यांनी वाढत्या मागणीमुळे नवे मार्ग घेतले, पण विमानांच्या शफलिंगची योग्य व्यवस्था केलेली नाही. अनेक विमानांतील तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती करण्यास वेळ लागला. परिणाम : शेड्यूल्ड फ्लाइट्सना २ तासांहून जास्त विलंब.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.