आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shortage Of Oxygen In Shahdol Medical College, Death Of 6 Patients In ICU Madhya Pradesh

मध्यप्रदेशमध्ये ऑक्सिजनची कमतरता:शहडोल मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचे शॉर्टेज, ICU मधील 12 रुग्णांचा मृत्यू; गेल्या 24 तासांत 22 रुग्ण दगावले

शहडोल9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 एप्रिल रोजी जबलपूरमध्ये झाले होते 5 रुग्णांचे मृत्यू

शहडोल मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन सप्लायचे प्रेशर कमी झाल्यामुळे 6 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. हे सर्व रुग्ण ICU मध्ये उपचार घेत होते. ही घटना शनिवारी रात्री 12 वाजता घडली असल्याची माहिती समोर येत आहे. ऑक्सिजन कमी होताच रुग्णांची तब्येत खालावत गेली आणि त्यानंतर ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये धावपळ सुरु झाली. परंतु सकाळी 6 पर्यंत एकापाठोपाठ एक गंभीर 6 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत रुग्णालयात यामुळे 16 रुग्ण मृत्युमुखी पडले आहे.

15 एप्रिल रोजी जबलपूरमध्ये झाले होते 5 रुग्णांचे मृत्यू
यापूर्वी 15 एप्रिल रोजी जबलपूरमधील मेडिकल प्लांटमध्ये बिघाड झाल्यामुळे ऑक्सिजन सप्लाय बंद पडला आणि 5 रुग्णांचा मृयू झाला होता. सर्व रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. येथील मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपल्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या 82 वर्षीय महिलेचा तडफडून मृत्यू झाला होता. 4 रुग्णांचा मृत्यू सुखसागर मेडिकल कॉलेजमध्ये झाला.

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी केली पुष्टी
शहडोल मेडिकल कॉलेजमधील घटनेबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी अर्पित वर्माने माहिती घेतली. दरम्यान, त्यांनी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 12 जण दगावल्याची पुष्टी केली. यापूर्वी हॉस्पिटलचे डीन डॉ. मिलिंद शिराळकर यांनी 6 रुग्ण मृत झाल्याची माहिती दिली होती.

एका दिवसापूर्वी आयुक्तांनी केली होती पाहणी
विशेष म्हणजे शनिवारी आयुक्त राजीव शर्मा यांनी या रुग्णालयाची पाहणी केली होती. दरम्यान, त्यांनी स्वच्छता आणि साफसफाई ठेवण्याचे निर्देश दिले होते. या दौऱ्यावर रुग्णालयातील लोकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. या दौऱ्यादरम्यान, त्यांच्यासोबत हॉस्पिटलचे डीन डॉ. मिलिंद शिराळकर, जिल्हाधिकारी डॉ. सत्येंद्र सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी अर्पित वर्मासमवेत अन्य अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...