आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजस्थानमधील पोकरण फायरिंग रेंजमध्ये मंगळवारी रात्री सैन्याच्या सरावादरम्यान एक दुर्घटना घडली. 105 एमएम गन (तोफ)मधून निघताच एक गोळा जागेवर फुटला. या दुर्घटनेत BSF मधील एक जवान शहीद झाला, तर 3 जण जखमी झाले. याप्रकरणी BSF ने चौकशीचे आदेश दिले आहेत. मागील 4 दिवसातील पोकरणमध्ये 105 एमएम गनमुळे हा दुसरा अपघात झाला आहे. चार दिवसांपूर्वी गनची बॅरेल फुटल्यामुळे एक जवान जखमी झाला होता.
सैन्यच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, BSF सध्या पोकरणमधील फायरिंग रेंजमध्ये सराव करत आहेत. सीमेजवळ किशनगडमध्ये BSF ची स्वतःची फायरिंग रेंज आहे. पण, 105 एमएम गनची रेंज 17 किलोमीटर असल्यामुळे गोळे दागण्याच्या सरावासाठी मोठी फायरिंग रेंजची आवश्यकता आहे. पोकरणमध्ये मोठी फायरिंग रेंज असल्यामुळे बीएसएफ येथे सराव करत आहे.
तोफेबाहेर निघताच गोळा फुटला
मंगळवारी रात्री सरावादरम्यान गनमधून बाहेर निघताच गोळा फुटला. या दुर्घटनेत चार जवान जखमी झाले होते. उपचारादरम्यान उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले जवान सतीश यांचा मृत्यू झाला. इतर तिघांचा उपचार सुरू आहे.
BSF कडे 140 एमएम गन
BSF कडे 140 एमएम गन आहेत. 7 आर्टिलरी रेजिमेंट याचा वापर करते. फक्त या गनमुळे युद्ध जिंकू शकत नाही, पण यामुळे शत्रुंना काही काळ रोखण्यात मदत मिळते. आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेने तयार केलेल्या या गनमधून 17 किलोमीटरपर्यंत मारा करता येतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.