आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीच्या श्रद्धा हत्याकांडाप्रकरणी आणखी एक नवा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने हॉलिवूड सेलिब्रिटी जॉनी डेप व अम्बर हर्डमधील मानहाणीच्या खटल्याची 100 तासांहून अधिकची लाइव्ह सुनावणी पाहिली होती. आफताबच्या इंटरनेट सर्च हिस्ट्रीतून ही नवी माहिती उजेडात आली आहे.
पोलिसांच्या मते, आफताबने या ट्रायलचा प्रत्येक पैलूचा बारकाईने अभ्यास केला होता. त्यात कौटूम्बिक हिंसाचारापासून दाम्पत्यांत होणाऱ्या सर्वच गोष्टींचा समावेश होता. आफताबने या ट्रायलमधूनच चौकशीत पोलिसांची कशी दिशाभूल करायची याचा धडा घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
आफताब म्हणाला - 4 महिन्यांपर्यंत श्रद्धाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले
दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब आमीन पूनावालाने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्यानंतर ते लगेचच जंगलात फेकले नव्हते. चौकशीत आफताबने सांगितले की, त्याने हे तुकडे जवळपास 4 महिन्यांपर्यंत घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. एवढेच नाही, तर हे तुकडे जंगलात फेकण्याची कल्पना त्याला आपल्या एका मित्राच्या घरी सूचली होती.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आफताबने पोलिसांना सांगितले की, श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट कशी लावायची हे आफताबला सूचत नव्हते. एकेदिवशी आपल्या मित्राच्या घराच्या छतावर फिरताना त्याला छत्तरपूरचे जंगल दिसले. त्यानंतर त्याने श्रद्धाचे तुकडे येथेच फेकण्याची कल्पना सूचली. त्यानंतर अनेक दिवस त्याने हे काम केले.
आफताबने प्रथम सांगितले होते - 3 आठवड्यांपर्यंत बॉडीपार्ट्स ठेवले
आफताबने श्रद्धाची 18 मे रोजी हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून जवळपास 3 आठवड्यांपर्यंत फ्रिजमध्ये ठेवल्याचे आतापर्यंत मानले जात होते. तसेच ते तुकडे त्याने सलग 16 दिवस जंगलात फेकल्याचेही पुढे आले होते.
आफताबच्या नव्या गर्लफ्रेंडने सांगितले - दोनदा त्याच्या घरी गेले
गत काही दिवसांपूर्वी आफताबच्या एका नव्या गर्लफ्रेंडचाही खुलासा झाला. तिने श्रद्धाच्या हत्येशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. ती म्हणाली - मी आफताबला भेटण्यासाठी त्याच्या घरी जात होते, तेव्हा श्रद्धाचे तुकडे फ्रिजमध्ये असल्याची आपल्याला माहिती नव्हती.
श्रद्धाची मे महिन्यात हत्या केल्यानंतर ही नवी मुलगी आफताबच्या संपर्कात आली होती. दोघांची भेट बम्बल एपच्या माध्यमातून झाली होती. याच APPवर श्रद्धा व आफताबची ओळख झाली होती.
आफताबला तुरुंगात देण्यात आले 'द ग्रेट रेलवे बाजार' पुस्तक
आफताब सध्या तिहार तुरुंगात बंदिस्त आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या सर्वच टेस्टमध्ये एकसारखीच उत्तरे दिली आहेत. त्याचा कबुलीजबाब, पॉलिग्राफ व नार्को टेस्टमधील उत्तरेही एकमेकांस पुरक आहेत.
दोन्ही टेस्टमध्ये त्याने श्रद्धाची हत्या केल्याची बाब मान्य केली आहे. आफताबने तिहार तुरुंग प्रशासनाकडे वाचण्यासाठी इंग्लिश नॉव्हेल व लिटरेचर बुक्स मागितले होते. त्याला ती लवकरच उपलबद्ध करवून देण्यात येणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.