आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्येपूर्वी पाहिला 'दृश्यम':आफताब श्रद्धाचा करत होता द्वेष, स्वतःच्या सुरक्षेसाठी पेरत होता पुरावे, पॉलीग्राफलाही देत आहे चकवा

वैभव पळणीटकर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा हत्याकांडाप्रकरणी आरोपी आफताब पूनावाला याची शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी पॉलीग्राफ टेस्ट होण्याची शक्यता आहे. FSL संचालक दीपा वर्मा यांनी याची पुष्टी केली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या टेस्टमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात येत आहे. श्रद्धाची हत्या करण्यापूर्वी आपण दृश्यम चित्रपट पाहिला होता. आपल्याला या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा होती, असे त्याने या टेस्टमध्ये म्हटले आहे.

FSL सूत्रांच्या माहितीनुसार, दृश्यम पाहिल्यानंतर तो श्रद्धा हत्याकांडाची एक कहाणी रचण्याच्या बेतात होता. आफताबने प्लॅनिंग करून मर्डर केला. त्यानंतर श्रद्धाचे मित्र, कुटुंबीयांशी चर्चा करून स्वतःला निर्दोष सिद्ध करता येईल असे पुरावे शोधू लागला.

आफताब याच प्लॅनिंगनुसार सातत्याने श्रद्धाच्या मित्रांशी फोन व सोशल मीडियावर संवाद साधून ती आपल्याला सोडून गेल्याचा दावा करत होता.

पॉलीग्राफ टेस्टमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पॉलीग्राफ टेस्टच्या पहिल्या दिवशी FSL च्या तज्ज्ञांनी आफताबला चित्रपट पाहून तू वाचू शकतोस असे तुला वाटतो काय? असा प्रश्न केला. त्यावर त्याने कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी आफताबला जवळपास 50 प्रश्न विचारण्यात आले. आफताब सातत्याने डीटेल्स विसरल्याचे नाटक करत आहे. तसेच एकाच प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर देत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी आफताबला जवळपास 50 प्रश्न विचारण्यात आले. आफताब सातत्याने डीटेल्स विसरल्याचे नाटक करत आहे. तसेच एकाच प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर देत आहे.

आफताबला त्यानंतर विचारण्यात आले की, तू दृश्यम चित्रपट पाहून कट रचला का? त्यावर त्याने हो असे उत्तर दिले. तो म्हणाला - हो दृश्यम पाहिला. आता तर दृश्यम पार्ट-2 ही आला आहे.

श्रद्धाचा द्वेष करत होता आफताब

या टेस्टमध्ये सहभागी तज्ज्ञांच्या मते, आफताब श्रद्धाचा द्वेष करत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, श्रद्धाला फिरण्याची आवड होती. यामुळे तो तिला उत्तराखंड व हिमाचल प्रदेशाला फिरण्यासाठी घेऊन गेला होता. यामागेही त्याचा तिची हत्या करण्याचा उद्देश होता. तो सर्वसामान्यांसारखा वागत होता. तसेच पुरावेही शोधत होता.

मानसोपचार तज्ज्ञांना वाटते की, आफताबने श्रद्धाची हत्या रागाच्या भरात नाही तर सूनियोजितपणे केली. याच प्लॅनिंगनुसार तो श्रद्धाला घेऊन मुंबईीहून दिल्लीला आला होता. आफताबने चौकशीत त्याचे श्रद्धाच्या आई-वडिलांशीही अनेकदा वाद झाल्याचे मान्य केले आहे.

तज्ज्ञांच्या मते, आफताबने कोर्टात सर्वकाही ‘हीट ऑफ द मोमेंट’मध्ये झाल्याचे सांगितले आहे. पण त्याने टेस्टमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहता त्याने श्रद्धाची हत्या करून तिचे तुकडे करण्याची सूनियोजित योजना आखली होती हे स्पष्ट होते. दुसरीकडे, आफताबचे वकील अविनाश कुमार यांनी आफताबने कोर्टात रागाच्या भरात हत्या केल्याची गोष्ट मान्य केली नसल्याचा दावा केला आहे.

पॉलीग्राफ टेस्टमध्ये आतापर्यंक काय-काय झाले?

FSL सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या पॉलीग्राफ टेस्टवेळी आफताबला सर्दी व ताप होता. तो वारंवार शिंकत होता. यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे रेकॉर्डिंगमध्ये चांगल्या पद्धतीने नोंदवता आली नाही. पोलिस व एफएसएल टीम हिंदीत प्रश्न विचारत आहे. तर आफताब जाणिवपूर्वक इंग्रजीत उत्तर देत आहे. शुक्रवारी त्याला पुन्हा या प्रश्नांची उत्तरे विचारली जातील.

पोलिसांना कसेही करून शुक्रवारी पॉलीग्राफ टेस्ट पूर्ण करायची आहे. कारण, आफताबचाी पोलिस कोठडी शनिवारी संपुष्टात येत आहे. त्याच दिवशी त्याला कोर्टात हजर केले जाईल. पॉलीग्राफ टेस्ट पूर्ण झाल्यानंतर सोमवारी आफताबची नार्को टेस्ट केली जाणार आहे.

आफताबने तुकडे कुठे फेकले हे सांगितले, पण पुरावे मिळणेही अत्यंत महत्त्वाचे

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे व शस्त्र फेकल्याची जागा सांगितली आहे. त्यानंतरही तो सातत्याने पोलिसांची दिशाभूल करत आहे. तो कधी विसरण्याचे नाटक करतो. तर कधी आपल्या विधानापासून फारकत घेतो.

तज्ज्ञांच्या मते, आफताब हे प्रकरण क्लिष्ट करण्याच्या प्रयत्नांत आहे. महरौलीच्या जंगलात पोलिसांना 15 हाडे आढळलेत. पण त्यांचा डीएनए रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे.

आफताबच्या किचन व बाथरूमच्या टाइल्सखाली रक्ताचे डाग आढळलेत. हे सर्वकाही आफताबला न्यायालयात दोषी सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत. पण यावर तज्ज्ञ संशय व्यक्त करत आहेत. त्यामुळे पोलिसांपुढे हत्येसाठी वापरण्यात आलेले करवत, चाकू, श्रद्धाचे रक्ताने माखलेले कपडे, पुराव्यांनी भरलेला श्रद्धाचा मोबाइल शोधण्याचे कठीण आव्हान उभे टाकले आहे.

श्रद्धा हत्याकांडाचे नवे अपडेट

  • पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावालाच्या फ्लॅटमधून 5 चाकू जप्त केलेत. त्यांची लांबी 5 ते 6 इंच आहे. पोलिसांच्या मते, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे याच चाकूने केले किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आफताब शेफ होता. त्यामुळे ते चाकू त्याच्या कामाशी संबंधितही असू शकतात.
  • महाराष्ट्र व दिल्ली पोलिस मुंबई स्थिति भाईंदर खाडीत आफताबच्या मोबाइलचा शोध घेत आहेत. हा शोध गुरुवारपासून सुरू आहे. आजही या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.
  • या केसच्या चौकशीसाठी गत महिन्यात वसईच्या माणिकपूर पोलिसांनी आफताबला बोलावले होते. तेव्हा त्याने आपल्या दोनपैकी एक मोबाइल येथे फेकला होता. एक मोबाइल त्याने OLX वर विकला होता. पोलिस तो रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...