आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफताबच्या मोबाइलचा भाईंदरच्या खाडीत शोध:पोलिसांनी मागील महिन्यात चौकशीसाठी बोलावल्यानंतर फेकला होता

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
आफताबकडे 2 मोबाइल होते. त्यातील एक त्याने येथे फेकला होता. हा फोन श्रद्धाचा असल्याचे मानले जात आहे. पण पोलिसांनी अद्याप त्याची पुष्टी केली नाही.

श्रद्धा हत्याकांडाप्रकरणी दिल्ली व महाराष्ट्र पोलिस मुंबई स्थित भाईंदरच्या खाडीत आफताबच्या मोबाईलाच शोध घेत आहेत. रात्र झाल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी गत महिन्यात वसईच्य माणिकपूर पोलिसांनी आफताबला चौकशीसाठी बोलावले होते. तेव्हा त्याने आपला 2 पैकी एक मोबाइल येथे फेकला होता.

दिल्ली व वसईच्या विरार मीरा भाईंदर पोलिसांनी संयुक्तपणे खाडीत सर्च ऑपरेशन राबवले.
दिल्ली व वसईच्या विरार मीरा भाईंदर पोलिसांनी संयुक्तपणे खाडीत सर्च ऑपरेशन राबवले.

आफताबची पॉलीग्राफ टेस्ट सुरू

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावालाच्या पॉलीग्राफ चाचणीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. ही टेस्ट दिल्लीच्या रोहिणी स्थित न्यायवैद्यक प्रयोगशाळेत होत आहे. सर्दी-तापीमुळे बुधवारी ही टेस्ट पूर्ण झाली नव्हती. या टेस्टमुळे आफतबाची नार्को टेस्ट लांबली आहे. ही टेस्ट पॉलीग्राफची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, PTIच्या वृत्तानुसार गृहमंत्री अमित शहा यांनी आपली या प्रकरणावर करडी नजर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले - माझी या प्रकरणावर नजर आहे. श्रद्धाची हत्या करणाऱ्या कमीत कमी कालावधीत कठोर शिक्षा दिली जाईल. यासाठी दिल्ली पोलिस सातत्याने काम करत आहेत.

आजचे मोठे अपडेट्स...

  • यासंबंधीच्या वृत्तानुसार, आफताबने प्रथम श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले.
  • पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, श्रद्धा व आफताबचा एक कॉमन फ्रेंडही उजेडात आला आहे. तो ड्रग्जची विक्री करतो. श्रद्धा व आफताबमध्ये अनेकदा ब्रेकअप झाले. पण त्यानंतर समेट करून पुन्हा ते एकमेकांसोबत राहत होते.
हे छायाचित्र रोहिणीच्या FSLचे आहे. पॉलीग्राफ टेस्टसाठी पोलिस आफतबाला घेऊन पोलिस दुपारी 1 च्या सुमारास येथे आले.
हे छायाचित्र रोहिणीच्या FSLचे आहे. पॉलीग्राफ टेस्टसाठी पोलिस आफतबाला घेऊन पोलिस दुपारी 1 च्या सुमारास येथे आले.

आजचे सर्वात मोठे अपडेट: मुंबई पोलिसांनी कारवाई का केली नाही? याचा होणार तपास

1. श्रद्धाची 2 वर्षांपूर्वीची तक्रार आली उजेडात

बुधवारी श्रद्धाने पोलिसांत केलेली एक तक्रार उजेडात आली. 23 नोव्हेंबर 2020 च्या या तक्रारीत श्रद्धाने आफताबव जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही तर आफताब आपले तुकडे-तुकडे करेल, असे ती या तक्रारीत म्हणाली होती. म्हणजे आफताबने 2 वर्षांनंतर श्रद्धाने व्यक्त केलेल्या भीतीनुसारच तिचे तुकडे केले. ही तक्रार उजेडात आल्यानंतर मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

2. मुंबई पोलिस म्हणाले - श्रद्धानेच तक्रार परत घेतली होती

23 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबईच्या पालघर पोलिसांत करण्यात आलेल्या श्रद्धाच्या तक्रारीवर महाराष्ट्र पोलिसांनी बुधवारीच आपली बाजू स्पष्ट केली. डीसीपी सुहास बावाचे यांनी सांगितले की, श्रद्धाच्या तक्रारीवर त्यावेळी योग्य ती कारवाई करण्यात आली होती. पण त्यानंतर आफताब व तिच्यातील वाद संपला. दोघांत समेट झाला. त्यानतंर आम्ही केस बंद केली.

3. फडणवीस म्हणाले - तक्रारीवर कारवाई केली असती तर श्रद्धा वाचली असती

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर श्रद्धा वाचली असती. या प्रकरणी कारवाई का केली नाही याचा तपास केला जाईल. मी ते पत्र पाहिले आहे. प्रकरण गंभीर आहे. मी कुणावरही आरोप करत नाही. पण एखाद्या तक्रारीचा तपास झाला नाही, तर त्याची चौकशी झाली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...