आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हआफताबने मारहाणीनंतर 5 दिवसांनी श्रद्धाला नेले होते रुग्णालयात:डॉक्टर म्हणाले - तिला चालताही येत नव्हते

पूनम कौशल14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा वालकर हत्याकांडात आफताब अजूनही पोलिसांची दिशाभूल करत आहे. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी तपास सुरू असून, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट केले. पण आफताबचा निर्दयीपणा सिद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी उजेडात आल्या आहेत. पण त्या कोर्टात टिकतील किंवा नाही हा मोठा कळीचा प्रश्न आहे.

मुंबईच्या ओझोन रुग्णालयाचे डॉक्टर शिवप्रसाद शिंदे यांनी माध्यमांना सांगितले की, 3 डिसेंबर 2020 रोजी श्रद्धा त्यांच्याकडे उपचारासाठी आली होती. तिच्या शरीरावर जखमा होत्या. शारीरीक मारहाणीमुळे तिला चालताही येत नव्हते. पण तिने काहीच स्पष्टपणे सांगितले नव्हते.

दिव्य मराठीकडे श्रद्धाचे सर्वच वैद्यकीय रिपोर्ट्स आहेत. त्यावरून तिच्या मान व पाठीवर गंभीर इजा झाली होती हे स्पष्ट होते.

रुग्णालयात श्रद्धाचा एक्सरे काढण्यात आला होता. हा त्याचा रिपोर्ट आहे. त्यात रुग्णाचे नाव मिसेस श्रद्धा वालकर नमूद आहे. हा रिपोर्ट 3 डिसेंबर 2020चा आहे.
रुग्णालयात श्रद्धाचा एक्सरे काढण्यात आला होता. हा त्याचा रिपोर्ट आहे. त्यात रुग्णाचे नाव मिसेस श्रद्धा वालकर नमूद आहे. हा रिपोर्ट 3 डिसेंबर 2020चा आहे.

डॉक्टरांचा दावा - आफताबने श्रद्धाचा उल्लेख पत्नी म्हणून केला होता

दिव्य मराठीने रुग्णालयाचे बिल व वैद्यकीय रिपोर्ट्स पाहिलेत. त्यावरून श्रद्धाला मारहाणीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट होते. 4 दिवसांपर्यंत तिच्यावर उपचार सुरू होते. श्रद्धा मान व कंबरदुखी, पायांना गोळे व मळमळीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डॉ. शिवप्रसाद शिंदे यांच्या माहितीनुसार, आफताब श्रद्धाला घेऊन रुग्णालयात आला तेव्हा त्याने ती आपली पत्नी असल्याचे सांगितले होते. तिच्या मान व पाठीत वेदना होत होत्या. तिला बरोबर चालताही येत नव्हते. ती 3 दिवसांपर्यंत आमच्याकडे दाखल होती. त्यानंतर आम्ही तिला सुट्टी दिली. तिच्यावर उपचार आणखी काही दिवस सुरू राहणार होते. पण त्यांनी नंतर आमचा फोन घेतला नाही किंवा परत आलेही नाही.

श्रद्धाने वेदना होत असल्याची तक्रार केली होती. डिस्चार्ज झाल्यानंतर 5 दिवसांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात येण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण ते आले नाही.
श्रद्धाने वेदना होत असल्याची तक्रार केली होती. डिस्चार्ज झाल्यानंतर 5 दिवसांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात येण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण ते आले नाही.

डॉक्टरांच्या मते, श्रद्धा जखमांचे कारण सांगण्यास कचरत होती. शुक्रवारीच श्रद्धा व तिच्या मित्रातील नोव्हेंबर 2020 मधील एक कथित चॅट उजेडात आले होते. त्यात ती मारहाणीचा उल्लेख करत आहे. सध्या पोलिस या चॅट्सची वस्तुस्थिती पडताळून पाहत आहेत.

श्रद्धाने ऑफिसमध्ये पोलिसांत जाण्याविषयीचे सांगितले होते

श्रद्धा मुंबईच्या ज्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती. तेथील एका मॅनेजरचाही दावा उजेडात आला आहे. त्याने नोव्हेंबर 2020 मध्ये श्रद्धाशी झालेल्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. श्रद्धा 24 नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या या चर्चेत म्हणते की, 'काल झालेल्या मारहाणीमुळे मी आज ऑफिसला येऊ शकत नाही.'

श्रद्धा मेसेजमध्ये म्हणते - 'मला वाटते माझा रक्तदाब की झाला आहे. वेदनाही होत आहेत. माझ्यात अंथरुणातून उठण्याचा त्राण नाही.' श्रद्धाने आपल्याला झालेल्या मारहाणीचा फोटोही मॅनेजरला पाठवला होता.

श्रद्धाने आपला हा फोटो शेअर केला होता. त्यात तिचे नाक व गालावर जखमाचे व्रण दिसून येत आहेत.
श्रद्धाने आपला हा फोटो शेअर केला होता. त्यात तिचे नाक व गालावर जखमाचे व्रण दिसून येत आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना श्रद्धाचे मॅनेजर करण यांनी सांगितले की, 'श्रद्धा माझ्या टीमशी 2020 मध्ये जुळली होती. ती अत्यंत ऊर्जावान मुलगी होती. ती तणावात असताना ऑफिसला येत नव्हती. पण तिने केव्हाच आपल्याला मारहाण होत असल्याचे सांगितले नव्हते. ती दुसरे एखादे कारण देत होती. नोव्हेंबर 2020 मध्ये तिने आपला चेहरा सुजल्याचे सांगितले होते. तेव्हा मला ती कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करत असल्याचे समजले.'

करणच्या मते, तिने आपल्याला आपल्या नवऱ्याने मारल्याचे सांगितले होते. मार्च 2021 पर्यंत मला ती लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे ठावूक नव्हते. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, श्रद्धाने आपल्यासोबत झालेल्या हिंसाचाराची तक्रार पोलिसांकडेही केली होती. पण आफताबने तिची समजून काढून ही तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते.

आफताबच्या कुटुंबाने श्रद्धाला विश्वासात घेतले होते. श्रद्धाव आफताबचे अनेकदा ब्रेकअप झाले. दोघांनाही वेगळ्या मार्गाने जायचे होते. पण ते पुन्हा एकत्र आले.

आफताबकडून पोलिसांची दिशाभूल, CCTV फुटेजवर आशा

दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी आपल्या निवेदनात म्हटले की, सध्या या प्रकरणी विस्तृत भाष्य करणे घाईचे ठरेल. सध्या सर्वच अंगाने तपास सुरू आहे. या प्रकरणी विस्तृत तपासानंतरच सर्वकाही स्पष्ट होईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना आफताबचे एक सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहे. त्यात आफताबच्या हातात एक बॅग दिसून येत आहे. पोलिस श्रद्धाचे अवयव शोधण्यासाठी महरौलीच्या जंगलात तपास करत आहेत. त्यांनी आफताब पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा दावा केला आहे.

पोलिसांनी उत्तराखंड व हिमाचल प्रदेशातही आपले अधिकारी पाठवलेत. ते तेथील हॉटेल्स व इतर ठिकाणी चौकशी करत आहेत, जिथे श्रद्धा व आफताब गेले होते.

गुरुग्राममध्ये एका पॉलिथीन बॅगेत आढळले बॉडी पार्ट्स

शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी गुरुग्रामच्या जंगलात काही पुरावे गोळा गेले. पोलिसांना एक पॉलिथीन बॅग मिळाली आहे. त्यात मृतदेहाचे तुकडे आहेत. ते श्रद्धाचे असू शकतात. यापूर्वी दिल्लीच्या पांडव नगर व त्रिलोकपुरीतही असेच तुकडे आढळले होते. त्यांचा तपास सुरू आहे.

दिल्ली पोलिसांचे एक पथक दुसऱ्या दिवशी शनिवारीही गुरुग्रामला पोहोचले. पोलिसांना हत्येसाठी वापरलेले हत्यार येथे फेकल्याचा संशय आहे. त्यामुळे टीम मेटल डिटेक्टरसह येथे पोहोचली होती.
दिल्ली पोलिसांचे एक पथक दुसऱ्या दिवशी शनिवारीही गुरुग्रामला पोहोचले. पोलिसांना हत्येसाठी वापरलेले हत्यार येथे फेकल्याचा संशय आहे. त्यामुळे टीम मेटल डिटेक्टरसह येथे पोहोचली होती.

या प्रकरणी पोलिस ठोस, डिजिटल, न्यायवैद्यक व बायोलॉजिकल पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आफताबने हा खून एवढ्या चलाखीने केला आहे की, त्याचा उलगडा करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत.

आता आफताबच्या नार्को टेस्टकडे नजरा

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत छतरपूरचे भाड्याच घर, महरौलीच्या जंगलात अनेक ठिकाणी एसएफल रोहिणीच्या टीमने तपास केला आहे. महरौली जंगल व आसपास झालेल्या तपासात काही हाडे मिळाली आहेत. त्यांचा डीएनए तपास केला जात आहे. पोलिसांना न्यायालयाकडून आफताबच्या नार्को टेस्टचीही परवानगी मिळाली आहे. पोलिसांच्या मते, ही टेस्ट लवकरच केली जाईल.

सद्यस्थितीत दिल्ली पोलिसांनी आफताबच्या घरात आढळलेले सर्वच कपडे आपल्या ताब्यात घेतलेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यात श्रद्धाचे कपडे नसल्यासारखेच आहेत. त्यांना श्रद्धाचे काही निवडक कपडे आढळलेत. पोलिसांना आफताबने हत्या करताना घातलेले कपडे अद्याप सापडले नाहीत. पोलिस अजूनही महरौलीच्या फ्लॅटची बारकाईने पडताळणी करत आहेत.

घरात आढळलेले बहुतांश कपडे आफताबचे आहेत. पोलिसांना श्रद्धाचेही कपडे आढळलेत. त्यांची न्यायवैद्यक तपासणी केली जात आहे.
घरात आढळलेले बहुतांश कपडे आफताबचे आहेत. पोलिसांना श्रद्धाचेही कपडे आढळलेत. त्यांची न्यायवैद्यक तपासणी केली जात आहे.

श्रद्धाचा आणखी ऑनलाइन फ्रेंड उजेडात

दुसरीकडे, श्रद्धाचा एक इन्स्टाग्राम मित्रही पुढे आला आहे. त्याने श्रद्धाने आपल्याला 18 मे रोजी सायंकाळी इंस्टाग्रामवर मेसेज केल्याचा दावा केला आहे. या मेसेजमध्ये तिने आपल्याकडे एक बातमी असल्याचा दावा केला होता.

त्यानंतर श्रद्धाने मित्राच्या मेसेजला कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे या मित्राने तिला तू सुरक्षित आहेस का? असा प्रश्न विचारला. पण त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी या मित्रालाही चौकशीसाठी बोलावले आहे.

बातम्या आणखी आहेत...