आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 फोटो, 37 बॉक्स अन् तो तलाव...:श्रद्धा हत्याकांडातील आफताब पूनावालाचे 3 रहस्य, दररोज नवनवे खुलासे

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा हत्याकांडाप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने महाराष्ट्रात डेरा टाकला आहे. आज दिल्लीत आफताब नार्को टेस्ट केली जाणार आहे. त्यातच 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केल्यानंतर 3 आठवड्यांनी आफताबने आपल्या वसईतील घरातून खूप सारे सामान दिल्लीत शिफ्ट केल्याचा नवा खुलासा झाला आहे.

रविवारी दिल्ली पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील वसईतील 3 जणांचे जबाब नोंदवले. यातील एकजण पॅकर्स अँड मूव्हर्स फर्मशी संबंधित असून, त्याच्याच माध्यमातून आफताबने आपल्या वसई (पूर्व) फ्लॅटमधून दिल्लीच्या छतरपूरमध्ये 37 बॉक्स मागवले होते. आफताबने अचानक मुंबईतून महरौलीतील छतरपूर पहाडीत शिफ्ट होण्याचा प्लॅन केला होता हे ही पोलिसांना समजले आहे. रेंट एग्रीमेंट ऑगस्ट 2022 मध्ये संपुष्टात येणार होते. जाणून घेऊया श्रद्धा हत्याकांडातील 3 रहस्य ज्यातून या प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो.

रहस्य 1: त्या 37 बॉक्समध्ये काय होते?

हत्येच्या 3 आठवड्यांनंतर 5 मे रोजी आफताबने मीरा रोड स्थित गुडलक पॅकर्स अँड मूव्हर्सशी संपर्क साधला होता. आफताबने 20 हजार रुपयांचे ऑनलाइन पेमेंट केले होते. कंपनीच्या गोविंद यादव यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना तिथे 37 पॅकेज होते, त्यात वॉशिंग मशीन व इतर घरसामान असल्याचे सांगितले आहे. श्रद्धा व आफताब 2019 पासून एकत्र राहत होते. ते वसईच्या 3 फ्लॅट्समध्ये राहिले होते.

आफताब व श्रद्धा.
आफताब व श्रद्धा.

पोलिसांनी आता आफताबच्या ओळखीच्या व त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. वसई (पश्चिम) स्थित यूनिक पार्क सोसायटीचे सचिव अब्दुल खान यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. या ठिकाणी पूनावाला कुटुंब मागील 2 दशकांपासून राहत होते. खान यांनी पोलिसांना सांगितले की, 12 नोव्हेंबर रोजी आफताबला अटक होण्यापूर्वी जवळपास 2 आठवडे अगोदर पूनावाला कुटुंब दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले होते.

त्यांनी आपण मुंबईत छोटा मुलगा असदकडे जाणार असल्याचे सांगितले होते. त्याला तिथे नोकरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पण आपल्या नव्या घराचा पत्ता देणे टाळले. यूनिक पार्क येथील घर पूनावाला कुटुंबाने भाड्याने दिले आहे.

रहस्य 2: 3 फोटो का जाळले?

आफताब कोणत्यातरी गोष्टीवरून नेहमीच श्रद्धावर राग करत होता अशी माहिती मिळाली आहे. सूत्रांनी इंग्रजी वृत्तपत्राला सांगितलेल्या माहितीनुसार, आफताबने पोलिसांना आपण तिचे 3 फोटो जाळल्याची माहिती दिली आहे. एवढेच नाही तर त्याने संतापाच्या भरात श्रद्धाच्या खात्यातून पैसेही ट्रान्सफर केले होते. त्याने दावा केला की, हे पैसे श्रद्धाने त्याच्याकडून उसणे घेतले होते व परत केले नव्हते.

आफताबने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, श्रद्धाच्या हत्येनंतर मी तिचे 3 मोठे फोटो जाळले. त्यातील 2 फोटो उत्तराखंडच्या ट्रिपचे होते. तिसरा फोटो 2020 मधील गेट वे ऑफ इंडियाचा होता. त्याने पहिला फ्रेम तोडला व जाळला. 26 मे रोजी त्याने श्रद्धाच्या खात्यातून 54 हजार रुपये काढले. हे पैसे श्रद्धाने उसणे घेतल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याने हत्येच्या दिवशी भांडणात श्रद्धाने काहीतरी त्याच्यावर फेकून मारल्याचेही सांगितले आहे. यामुळे राग आल्याने त्याने तिची गळा दाबून हत्या केली. पण पोलिस त्याच्या या दाव्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची नार्को टेस्ट करणार आहे.

या छायाचित्रात श्रद्धाच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुना दिसून येत आहेत.
या छायाचित्रात श्रद्धाच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुना दिसून येत आहेत.

रहस्य 3: तलावात फेकले होते श्रद्धाचे शिर?

दिल्ली पोलिसांचे अधिकारी महरौलीत श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी जंगलात त्यांना कवटीचे काही भाग, जबडा व काही हाडे आढळली. पण हा जबडा श्रद्धाचाच आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दक्षिण दिल्लीच्या मैदानगढीतील एक तलावातही श्रद्धाच्या धडावेगळ्या करण्यात आलेल्या मुंडक्याचा शोध घेतला जात आहे. यासाठी या तलावातील पाणी उपसले जात आहे. आफताबने याच तलावात श्रद्धाचे मुंडके व इतर अवयव फेकल्याचा दावा केला आहे.

आफताबची लवकरच नार्को टेस्ट होणार.
आफताबची लवकरच नार्को टेस्ट होणार.

काय आहे प्रकरण

आफताब पूनावालाने 18 मे रोजी 27 वर्षीय श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून ते दक्षिण दिल्लीच्या महरौली स्थित आपल्या घरातील फ्रिजमध्ये ठेवले. हे तुकडे तो अनेक दिवसांपर्यंत मध्यरात्रीनंतर शहराच्या विविध भागांत जाऊन फेकत होता. दरम्यान, दिल्लीच्या एका न्यायालयाने पोलिसांना आफताबवर थर्ड डिग्रीचा वापर करण्यास मनाई केली आहे.