आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धा हत्याकांड:आरोपी आफताबने केला जामिनासाठी अर्ज, उद्या साकेत कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याने दिल्लीतील साकेत न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर आफताब न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या जामीन अर्जावर शनिवारी म्हणजेच उद्या सुनावणी होणार आहे. आफताबला 12 नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.

श्रद्धाच्या वडिलांनी पोलीस आयुक्तांची घेतली भेट
श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी आज पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले- माझ्या मुलीने नोव्हेंबर 2020 मध्ये केलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत मी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. डीएनए जुळणे हा महत्त्वाचा पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले. मी आयुक्तांकडे आफताबच्या कुटुंबीयांची तक्रारही केली आहे. आफताबच्या कुटुंबीयांकडे सर्व माहिती होती. तरीही त्यांनी मला काहीही सांगितले नाही.

मेहरौलीच्या जंगलात सापडलेली हाडे आणि श्रद्धाच्या वडिलांचा DNA जुळला
दिल्लीच्या जंगलात सापडलेल्या हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांशी जुळला आहे. डीएनए चाचणीत याची पुष्टी झाल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. मेहरौलीच्या जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच आहेत. दुसरीकडे, दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरांनी ट्रायल कोर्टात श्रद्धा हत्याकांडासाठी विशेष सरकारी वकिलांना परवानगी दिली आहे.

आफताबने नार्को व पॉलीग्राफ टेस्टमध्ये स्वीकारली होती हत्येची गोष्ट
गत महिन्यात आफताबची नार्को टेस्ट करण्यात आली होती. त्यात त्याने श्रद्धाची हत्या केल्याची बाब कबूल केली होती. दिल्लीच्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात सलग 2 तास आफताबची नार्को टेस्ट झाली. त्यात विचारण्यात आलेल्या बहुतांश प्रश्नांना त्याने इंग्रजीत उत्तर दिले. त्याने पॉलीग्राफ टेस्टमध्येही श्रद्धाच्या हत्येची गोष्ट कबूल केली होती. तसेच आपल्याला या प्रकरणी कोणताही पश्चाताप होत नसल्याचेही स्पष्ट केले होते.

काय आहे प्रकरण
आफताब पूनावालाने 18 मे रोजी 27 वर्षीय श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून ते दक्षिण दिल्लीच्या महरौली स्थित आपल्या घरातील फ्रिजमध्ये ठेवले. हे तुकडे तो अनेक दिवसांपर्यंत मध्यरात्रीनंतर शहराच्या विविध भागांत जाऊन फेकत होता. दरम्यान, दिल्लीच्या एका न्यायालयाने पोलिसांना आफताबवर थर्ड डिग्रीचा वापर करण्यास मनाई केली आहे.

12 नोव्हेंबर रोजी आफताबला अटक
आफताबला गत 12 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले. 17 नोव्हेंबर रोजी त्याची कोठडी आणखी 5 दिवसांसाठी वाढवण्यात आली. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी कोर्टाने त्याची रवानगी 13 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत केली. 9 डिसेंबर रोजी दिल्लीच्या साकेत कोर्टात व्हिसीद्वारे हजर करण्यात आले. PTIच्या वृत्तानुसार, कोर्टाने आफताबच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.

बातम्या आणखी आहेत...