आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shraddha Murder Case Aftab's Narco Test | Police Prepares List Of 40 Questions, Search For Murder Weapon Begins | Marathi News

श्रद्धाचे मुंडके शोधण्यासाठी पोलिस करणार तलाव रिकामा:महरौलीच्या जंगलात आतापर्यंत 17 हाडे आढळली, उद्या आफताबची नार्को टेस्ट

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा हत्याकांडात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आफताबने श्रद्धाचे धडावेगळे केलेले शिर दिल्लीच्या एका तलावात फेकल्याचा दावा केला आहे. त्यानुसार, दिल्ली पोलिस रविवारी सायंकाळी छतरपूर जिल्ह्यातील मैदान गढी भागात जाऊन तेथील तलाव रिकामा करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी गोताखोरांनाही पाचारण करण्यात आले आहे.

स्थानिकांच्या मते, पोलिस आफताबला घेऊन येथे पोहोचलेत. त्याने याच तलावात श्रद्धाचे मुंडके फेकल्याचे कबूल केले आहे. मर्डर वेपनही गायब आहे. पोलिसांना महरौलीच्या जंगलात आतापर्यंत 17 हाडे आढळली आहेत. ती वैद्यकीय परिक्षणासाठी पाठवण्यात आली आहेत.

दुसरीकडे, आरोपी आफताबची उद्या म्हणजे सोमवारी नार्को टेस्ट होणार आहे. यासाठी पोलिसांनी 40 प्रश्नांची यादी तयार केली आहे. आफताबने श्रद्धाचा इतक्या निर्दयीपणे खून केला आहे की, गूढ उलगडणे आणि घटनांची साखळी जोडणे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे. या चाचणीतून काही महत्त्वाची माहिती मिळू शकेल, अशी आशा पोलिसांना आहे.

तत्पूर्वी, शनिवारी 18 ऑक्टोबरचे सीसीटीव्ही फुटेज दिल्ली पोलिसांच्या हाती लागले होते. यामध्ये पहाटे चार वाजता आफताब बॅग घेऊन जाताना दिसत आहे. तो श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे टाकण्यासाठी गेला होता, असा संशय पोलिसांना आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांनी मेहरौली फ्लॅटमधून सर्व कपडे जप्त केले आहेत. यामध्ये श्रद्धाच्या कपड्यांचाही समावेश आहे.

श्रद्धा खून प्रकरणाचे अपडेट्स...

  • पुरावे शोधण्यासाठी मेहरौली जंगलात शोध मोहीम आजही सुरू राहणार आहे.
  • याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
  • पोलीस पुरावा म्हणून श्रद्धाची मैत्रिण शिवानी म्हात्रे आणि तिचा सहकारी करण बेहरी यांच्या व्हॉट्सअॅप चॅट्सचा वापर करणार आहेत.
  • आफताब पूनावाला यांच्या कुटुंबाचा शोध सुरू आहे.
  • श्रद्धाच्या वडिलांनी असा दावा केला की ते वसईतील आफताबच्या घरी गेले होते, परंतु त्यांच्या कुटुंबाने त्यांना अपमानित केले आणि परत न येण्याचा इशारा दिला.

खालील फोटो संपूर्ण प्रकरणाची कथा सांगतात...

श्रद्धाने हा फोटो तिच्या मैत्रिणींसोबत शेअर केला होता. यामध्ये तिच्या नाकावर आणि गालावर जखमेच्या खुणा दिसत आहेत.
श्रद्धाने हा फोटो तिच्या मैत्रिणींसोबत शेअर केला होता. यामध्ये तिच्या नाकावर आणि गालावर जखमेच्या खुणा दिसत आहेत.
आफताब हिरव्या रंगाच्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होता. तो कोणालाही भेटत नव्हता. या प्रकरणापूर्वी इमारतीत राहणाऱ्या लोकांना त्याचे नावही माहित नव्हते.
आफताब हिरव्या रंगाच्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होता. तो कोणालाही भेटत नव्हता. या प्रकरणापूर्वी इमारतीत राहणाऱ्या लोकांना त्याचे नावही माहित नव्हते.
आफताबला घेऊन पोलीस मेहरौलीच्या जंगलात पोहोचले. पोलीस अद्याप हत्येचे हत्यार आणि श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा शोध घेत आहेत.
आफताबला घेऊन पोलीस मेहरौलीच्या जंगलात पोहोचले. पोलीस अद्याप हत्येचे हत्यार आणि श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा शोध घेत आहेत.
घरातून सापडलेले बहुतांश कपडे आफताबचे आहेत. पोलिसांना श्रद्धाचे कपडेही सापडले आहेत. त्यांना फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या दोघांनी घटनेच्या दिवशी परिधान केलेले कपडे अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत.

ही चॅट 2020 सालची आहे. यामध्ये श्रद्धाने तिचा माजी मॅनेजर करणला तिच्यासोबत झालेल्या भांडणाचा उल्लेख केला होता.
ही चॅट 2020 सालची आहे. यामध्ये श्रद्धाने तिचा माजी मॅनेजर करणला तिच्यासोबत झालेल्या भांडणाचा उल्लेख केला होता.
श्रद्धा आणि आफताब 2019 पासून रिलेशनशिपमध्ये होते.
श्रद्धा आणि आफताब 2019 पासून रिलेशनशिपमध्ये होते.
बातम्या आणखी आहेत...