आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shraddha Murder Case | Aftab's Police Custody Extended By 4 Days Confession Before Judge In Court Everything Happened In Anger | Marathi News

आफताबची पॉलीग्राफी टेस्ट सुरू:रोहिणी FSL लॅबमध्ये तपासणी; कोर्टाने आरोपीला कुटुंबीयांशी भेटण्याची परवानगीही दिली

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आफताबला मंगळवारी साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. तेथे युक्तिवाद झाला की, एक महिना उलटूनही आफताब हत्याकांडाचा तपशील देऊ शकत नाही. त्यांची विधाने एकसारखी नाहीत. कोर्टात आफताबची ही दुसरी आभासी उपस्थिती होती. कोर्टाने आफताबला कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी दिली आहे. दुसरीकडे, एएनआय या वृत्तसंस्थेने पोलिस सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, मंगळवारी संध्याकाळी रोहिणी एफएसएल लॅबमध्ये आफताबची पॉलीग्राफी चाचणी सुरू झाली.

आफताबने न्यायालयात हत्येची कबुली दिल्याचा दावा कायदेशीर वृत्त वेबसाइट बार अँड बेंच आणि इतर काही माध्यमांनी केला आहे. त्याने चिथावणी आणि रागातून श्रद्धाची हत्या केल्याचे न्यायाधीशांना सांगितले. तसेच मी पोलिसांना सर्व काही सांगितल्याचे म्हटले. आता ती घटना आठवणे कठीण आहे, असे तो म्हणाला.

हे वृत्त समोर आल्यानंतर तासाभरातच आफताबचे वकील अविनाश कुमार यांनी हत्येची कबुली ही अफवा असल्याचे म्हटले. ते म्हणाले- आफताबने असा कोणताही कबुलीजबाब दिलेला नाही. असे कोणतेही स्टेटमेंट रेकॉर्डवर घेतलेले नाही. होय, तो नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करत होता की श्रद्धा त्याला भडकवायची आणि दोघांमध्ये भांडणे व्हायची.

वकिलांनी सांगितले की, आफताबने त्या तलावाचे स्केच बनवले होते ज्यात त्याने श्रद्धाचे तुकडे फेकले होते. अविनाशने आफताबला भेटण्याची परवानगी मागितली होती, ती न्यायालयाने मंजूर केली. अटक झाल्यापासून आफताबला कोणीही भेटू शकलेले नाही.

आज मोठा पुरावा मिळाला, नवा खुलासाही

पुरावा : आफताबच्या बाथरूमच्या टाइल्समधून दिल्ली पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी हे पुरावे मिळवले आहेत. पुरावे काय आहेत, हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. यापूर्वी आफताबच्या बाथरुमच्या टाइल्सवरही रक्ताच्या खुणा आढळून आल्या होत्या. तज्ज्ञांचा अहवाल यायला 2 आठवडे लागतील.

खुलासा : पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, श्रद्धा आणि आफताबचा एक कॉमन फ्रेंडही समोर आला आहे, जो ड्रग्ज विकायचा. श्रद्धा आणि आफताबमध्ये अनेकदा ब्रेकअप झाला आणि नंतर दोघेही समेट करून पुन्हा एकत्र राहू लागले होते.

पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी आफताब.
पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी आफताब.

आफताबने सांगितले - गुरुग्राममध्ये फेकली ब्लेड आणि करवत

काही वृत्तांमध्ये आफताबने पोलिसांना खुनाच्या शस्त्राबाबत माहिती दिल्याचे बोलले जात आहे. चौकशीदरम्यान, हत्येनंतर त्याने मृतदेह कापण्यासाठी वापरलेले करवत आणि ब्लेड गुरुग्राममध्ये फेकून दिल्याचे सांगण्यात आले. हत्येचे हत्यार शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी गुरुग्रामच्या जंगली भागात आतापर्यंत दोनदा शोध घेतला आहे. आता पोलीस पुन्हा जंगलात शोधमोहीम राबवणार आहेत.

श्रद्धाने हा फोटो तिच्या मित्राला शेअर केला होता. यात तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा दिसत आहेत.
श्रद्धाने हा फोटो तिच्या मित्राला शेअर केला होता. यात तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा दिसत आहेत.

पोलिसांना सापडला मानवी जबडा

श्रद्धाच्या शरीराच्या अवयवांचा शोध घेत असताना सोमवारी दिल्ली पोलिसांना मानवी जबडा सापडला. हा जबडा श्रद्धाचा आहे की नाही हे शोधण्यासाठी डेंटिस्टची मदत घेतली जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेले सर्व मानवी अवयव तपासणीसाठी न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, जबड्याची तपासणी करणार्‍या दंतचिकित्सकाने सांगितले की, मी पोलिसांना श्रद्धाच्या जबड्याचा एक्स-रे मुंबईत श्रद्धाच्या रूट कॅनालवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून मागवण्यास सांगितले. क्ष-किरणांशिवाय काहीही सांगणे कठीण आहे.

बातम्या आणखी आहेत...