आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shraddha Murder Case | Hindu Muslim Couple's Reception Canceled, Vasai's Religious Organizations Call Off Ceremony, Tweet Stirs Uproar | Marathi News

श्रद्धाच्या हत्येनंतर हिंदू-मुस्लिम कपलचे रिसेप्शन रद्द:वसईच्या धार्मिक संघटनांनी सोहळा थांबवला, एका ट्विटमुळे खळबळ

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या क्रूरतेने श्रद्धा वालकरची हत्या करण्यात आली, त्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. सर्वत्र आरोपी आफताबविरोधात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रातील वसईमध्ये नवविवाहित हिंदू-मुस्लिम जोडप्याचे लग्नाचे रिसेप्शन थांबवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, वसईतील स्थानिक धार्मिक संघटनांनी विरोध केल्यानंतर या रिसेप्शनवर बंदी घालण्यात आली. 27 वर्षीय श्रद्धा ही पालघरमधील वसई येथील रहिवासी होती, तिची हत्या करून आरोपीने तिचे 35 तुकडे केले होते.

ट्विट व्हायरल झाल्यानंतर उडाली खळबळ
एका खासगी वृत्तवाहिनीच्या संपादकाने शुक्रवारी समारंभाच्या निमंत्रणाचा फोटो ट्विट केल्याने रिसेप्शन प्रकरण समोर आले. एवढेच नाही तर त्याने लव्ह जिहाद आणि दहशतवादी कायद्याचा वापर करून श्रद्धा हत्याकांडाशी संबंध जोडला. संपादकाने ट्विटरवर हॅशटॅग-लव्हजिहाद ट्रेंड केला.

परिसरात शांतता राखण्यासाठी रिसेप्शन पार्टी थांबवण्यात आली होती
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी सांगितले की, रविवारी एका सभागृहात हिंदू-मुस्लिम जोडप्याचे लग्नाचे रिसेप्शन होणार होते. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर स्थानिक हिंदू आणि मुस्लिम संघटनांनी हॉलच्या मालकाला बोलावून रिसेप्शन थांबवण्यास सांगितले. परिसरात शांतता राखण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

माणिकपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रिस्पेशन थांबवले नसते तर वसई परिसरात काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती, त्यामुळे काही दिवस रिसेप्शन सोहळा पुढे ढकलण्यात आला.

घरच्यांच्या संमतीने दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते
पोलिसांनी सांगितले की, हिंदू-मुस्लिम जोडप्याने कुटुंबाच्या संमतीने 17 नोव्हेंबर रोजी कोर्ट मॅरेज केले होते. 29 वर्षीय महिला हिंदू आहे तर तिचा नवरा मुस्लिम आहे. दोघेही गेल्या 11 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. या जोडप्याचे कुटुंबीय शनिवारी माणिकपूर पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी सांगितले की, रिसेप्शन तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे.

आफताबने 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केली होती
28 वर्षीय आफताबने 18 मे रोजी श्रद्धाची हत्या करून तिचे 35 तुकडे केले आणि जंगलात फेकून दिले. दोघे 2019 पासून रिलेशनशिपमध्ये होते. ओळख लपवण्यासाठी श्रद्धाचा चेहरा जाळल्याची कबुली आफताबने पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. पोलिसांना आतापर्यंत 13 तुकडे सापडले आहेत. त्यांची फॉरेन्सिक आणि डीएनए तपासणी केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...