आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Shraddha Murder Case | Shraddha's Chat With Ex manager Surfaced, Mentioning The Beating In 2020 | Marathi News

आफताबचे आढळले CCTV फुटेज:एकाच दिवशी 3 बॅग घेऊन जाताना दिसला; पोलिसांना त्यात श्रद्धाचे तुकडे असण्याची शंका

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

श्रद्धा हत्याकांडात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पोलिसांच्या हाती 18 ऑक्टोबरचे एक CCTV फुटेज लागले आहे. त्यात आफताब एक बॅग घेऊन जाताना दिसून येत आहे. पोलिसांना या बॅगमध्ये श्रद्धाच्या शरीराचे तुकडे असल्याचा संशय आहे. हे तुकडे त्याने आपल्या घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. तो ते फेकण्यासाठी घेऊन जात असावा, असे पोलिसांना वाटते. आफताबने त्या दिवशी तब्बल 3 वेळा घराबाहेर पडला होता.

श्रद्धा मर्डरचे अपडेट्स...

 • पुराव्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस महरौलीच्या जंगलात सलग 6 व्या दिवशी शोध मोहिम राबवत आहेत.
 • आज आफताबची नार्को टेस्ट केली जाणार.
 • श्रद्धाच्या बॉडीचे मिळालेल्या 13 तुकड्यांची DNA टेस्ट होईल.
 • पोलिस आफताबला हिमाचलच्या पार्वती घाटी व दिल्लीच्या जंगलात नेऊन सीन रीक्रिएट करणार.
 • आफताबची इंटरनेट हिस्ट्री काढण्यासाठी लवकरच गुगलशी चर्चा केली जाणार.
 • श्रद्धाचे मित्र राहुल व गॉडविनची चौकशी झाली.
 • श्रद्धाचे तुकडे, मोबाइल व मर्डर वेपन शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांची एक टीम हिमाचल प्रदेशातील पार्वती घाटीतील तोष गावात गेली आहे.
 • दिल्ली पोलिस आफताबला घेऊन गुरुग्रामच्या डीएलएफ फेज-2 मध्ये गेले. तिथे मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून तपास केला जात आहे.
 • श्रद्धाने आपला माजी मॅनेजरला आफताब मारहाण करत असल्याचे सांगितले होते.

तत्पूर्वी, श्रद्धाने आपल्या सहकाऱ्याशी 2020 मध्ये केलेल्या व्हॉट्सअॅप चर्चेचे चॅटही माध्यमांत आले आहे. त्यात श्रद्धाने मारहाणीचा उल्लेख केला आहे. हे चॅटिंग तिने आपला तत्कालीन मॅनेजर करण भक्कीशी केले होते. तेव्हा ती मुंबईत काम करत होती.

चॅटमध्ये श्रद्धा म्हणत आहे– कालच्या मारहाणीनंतर मी आज कामावर येऊ शकणार नाही. मला वाटते की माझा रक्तदाब कमी आहे आणि माझे शरीर दुखत आहे. यामध्ये श्रद्धा एका व्यक्तीचा उल्लेख करत आहे की, तो आज बाहेर पडेल याची मला खात्री करावी लागेल.

चॅटचे स्क्रीनशॉट्स...

चॅटमध्ये केलेल्या गोष्टी...

 • 24 नोव्हेंबर 2020 ते 3 डिसेंबर 2020 या कालावधीत झालेल्या या चॅटमधील चर्चा डॉक्टरांच्या अहवालाशी जुळतात. यावरून श्रद्धाला दोन वर्षांपूर्वी पाठीच्या आणि मानेच्या दुखण्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
 • 23 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या चॅटमध्ये ती त्या वेळी राहत असलेल्या ठिकाणाहून निघून जाण्याविषयी सांगत आहे. ती म्हणते की ती पोलीस ठाण्यात जाऊन 'महिला मंडळाला' भेटणार आहे. यानंतर सहकर्मचाऱ्याने तिला तिचा फोटो शेअर करण्यास सांगितले, तेव्हा श्रद्धानेही चेहऱ्यावर जखमा असलेले फोटो पाठवले आणि ती कामावरून सुट्टी घेण्यासाठी वापरणार असल्याचे सांगितले.
 • दुसर्‍या टेक्स्टमध्ये, श्रद्धाने घटनेदरम्यान तिला झालेल्या दुखापतींचे कारण तिच्या मित्रांपासून लपवले आहे. जेव्हा तिच्या मैत्रिणींनी तिला नाकाला काय झाले असे विचारले तेव्हा श्रद्धाने उत्तर दिले की पायऱ्या चढत असताना घसरल्याने तिचे नाक तुटले होते.
श्रद्धाच्या मैत्रिणीने तिचा हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये चेहऱ्यावर जखमेच्या खुणा दिसत आहेत. हा फोटो दोन वर्षांपूर्वीचा आहे.
श्रद्धाच्या मैत्रिणीने तिचा हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये चेहऱ्यावर जखमेच्या खुणा दिसत आहेत. हा फोटो दोन वर्षांपूर्वीचा आहे.

श्रद्धाने आफताबला तिचा नवरा सांगितले : करण
श्रद्धाचे माजी व्यवस्थापक करण म्हणाले की, नोव्हेंबर 2020 मध्ये मला पहिल्यांदा घरगुती अत्याचाराची माहिती मिळाली. विश्वासच बसत नाही की कोणी एवढ्या वाईट पद्धतीने कसे मारू शकतो. यापूर्वीही अनेकदा आजारी पडल्याचे तिने सांगितले. त्यादरम्यान श्रद्धा म्हणाली होती की, ती तिच्या आई आणि बहिणीकडे संरक्षणासाठी जाऊ शकते. करणने सांगितले की, श्रद्धाने त्याला आफताब तिचा नवरा असल्याचे सांगितले होते.

करणने सांगितले की, पोलिसांकडे गेल्यावर तिने लेखी तक्रार दिली. पण दरम्यान आफताबने धमकी दिली की जर तिने त्याला सोडले तर तो स्वत: ला काहीतरी करेल. त्यानंतर श्रद्धाने पोलिस तक्रार न करण्याचा विचार केला. त्याने सांगितले की या घटनेनंतर त्याने श्रद्धाला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि ती सुरक्षित आहे की नाही हे पाहण्यासाठी काही आठवडे तिच्यावर नजर ठेवली.

करणने सांगितले- मला वाटत होते की दोघे आता एकत्र नाहीत. नंतर ते पुन्हा कसे भेटले ते मला माहित नाही. ती दिल्लीला गेल्याचे मलाही माहीत नव्हते. हे सगळं बातमीत आल्यावर कळलं.

आफताबने 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केली होती
28 वर्षीय आफताबने 18 मे रोजी श्रद्धाची हत्या करून तिचे 35 तुकडे केले आणि जंगलात फेकून दिले. दोघे 2019 पासून रिलेशनशिपमध्ये होते. ओळख लपवण्यासाठी श्रद्धाचा चेहरा जाळल्याची कबुली आफताबने पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. पोलिसांना आतापर्यंत 13 तुकडे सापडले आहेत. त्यांची फॉरेन्सिक आणि डीएनए तपासणी केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...