आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shraddha Murder Case:|Aftab Narco Test From Today | Brain Mapping May Also Be Done

आफताबची नार्को चाचणी संपली:2 तास विचारले प्रश्न, श्रद्धाचा मोबाईल आणि कपडे कुठे फेकले ते सांगितले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची नार्को टेस्ट संपली आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबचे सहाय्यक संचालक संजीव गुप्ता यांनी सांगितले की, पॉलीग्राफ चाचणीनंतर आफताबने नार्को चाचणीतही श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने श्रद्धाचा मोबाईल आणि कपडे कुठे फेकले याची माहितीही दिली आहे.

दिल्ली पोलिसांनी आफताबला सकाळी 8.40 वाजता रोहिणीच्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेले, जिथे चाचणीपूर्वी त्याची सामान्य तपासणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10 वाजता चाचणी सुरू झाली आणि सुमारे दोन तासांनंतर संपली. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने टेस्टमध्ये विचारलेल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत दिली. संजीव गुप्ता यांनी सांगितले की, नार्को चाचणीवेळी मानसशास्त्रज्ञ, फॉरेन्सिक लॅब रोहिणीचे छायाचित्र तज्ज्ञ आणि आंबेडकर रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित होते.

आफताबच्या चौकशीशी संबंधित 3 महत्त्वाच्या गोष्टी...

1. ब्रेन मॅपिंग देखील होऊ शकते
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FS) टीमने नार्को चाचणीची तयारी पूर्ण केली आहे. नार्को चाचणीवेळी एफएसएल टीमसोबत डॉक्टरही उपस्थित राहणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, जर नार्को टेस्टमधून काही निष्पन्न झाले नाही तर, पोलिस आफताबच्या ब्रेन मॅपिंग टेस्टचीही मागणी करू शकतात.

2. आफताब सर्व काही मान्य करत होता, इथेच संशय अधिक वाढला
तपासात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आफताब खूप हुशार आहे आणि केव्हाही या प्रकरणात नवीन वळण आणू शकतो. आतापर्यंत तो पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करत आहे. पॉलीग्राफ आणि नार्को टेस्टसाठीही तयार झाला आहे. त्याचवेळी त्याच्या चांगल्या वागणुकीवर पोलिसांना संशय येत आहे.

3. चौकशीदरम्यान आफताब खूप कॉन्फिडन्ट होता
चौकशीदरम्यान आफताब खूप कॉन्फिडन्ट असल्याचेही पोलिस सूत्रांकडून समजले आहे. जेव्हा त्याला प्रश्न विचारला जातो तेव्हा तो उत्तरे खूप फास्ट आणि रिलॅक्स देतो. यावरून तो सर्वकाही प्लॅननुसार उत्तर देत असल्याचे दिसून येते. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आफताबला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते, तेव्हा श्रद्धाच्या शरीराचे काही अवयव त्याच्या दिल्लीतील फ्लॅटमध्ये होते असाही पोलिसांना संशय आहे.

श्रद्धा हत्याकांडात नवा खुलासा : आफताबच्या नव्या मैत्रिणीने दिले स्टेटमेंट

श्रद्धा हत्याकांडात आफताबची नवी गर्लफ्रेंड समोर आली आहे. आपला श्रद्धाच्या हत्येशी किंवा त्याच्या तुकड्यांशी काहीही संबंध नसल्याचा दावा तिने केला आहे. जेव्हा ती आफताबच्या घरी त्याला भेटायला गेली होती. तेव्हा आफताबने या घरात श्रद्धाचे तुकडे ठेवले होते याची आपल्याला कल्पना नव्हती, असे तिने सांगितले. | संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

आफताबला वाचवणाऱ्या पोलिसांना मिळाले बक्षीस

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबला वाचवणाऱ्या पोलिसांना बक्षीस मिळाले आहे. दिल्ली पोलीस आयुक्तांनी कौतुक करत 10-10 हजार रुपये दिले आहेत. आफताबवरील हल्ल्यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्यामुळे आनंद व्यक्त केला.

प्रत्यक्षात सोमवारी रोहिणीतील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) बाहेर आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर ४-५ जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात तलवारी होत्या. या हल्लेखोरांपासून पोलिसांनी आफताबला वाचवले होते. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली होती. चौघांचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...