आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धाचे लग्न हीच तिच्या आईची अंतिम इच्छा होती:लाचार बाप पत्नीच्या इच्छेसाठी आफताबच्या घरी मुलीचे स्थळ घेऊन गेला, पण...

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा हत्याकांडाची मुंबई, दिल्लीसह संपूर्ण देशात चर्चा रंगली आहे. या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत. ताज्या माहितीनुसार, श्रद्धाचे वडील विकास इच्छा नसूनही श्रद्धा व आफताब पूनावालाच्या लग्नासाठी तयार झाले होते. ते तिचे स्थळ घेऊन आफताबच्या घरीही गेले होते. पण आफताबचा छोटा भाऊ असदने त्यांना आपल्या घराची पायरीही चढू दिली नाही. त्यानंतर श्रद्धाच्या आजारी आईचे जानेवारी 2020 मध्ये निधन झाले.

यासंबंधीच्या माहितीनुसार, श्रद्धाचे लग्न ही तिच्या आईची शेवटची इच्छा होती. त्यातच श्रद्धा आफताबच्या प्रेमात पडली होती. ही गोष्ट श्रद्धाच्या वडिलांना मान्य नव्हती. त्यानंतरही आपल्या पत्नीची इच्चा पूर्ण करण्यासाठी विकास यांनी 2019 च्या डिसेंबर महिन्यात ते आफताबच्या घरी श्रद्धाचे स्थळ घेऊन गेले. पण आफताबचा छोटा भाऊ असद याने त्यांना घरात प्रवेश दिला नाही. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये श्रद्धाच्या आईचे निधन झाले.

आफताब आपल्या कुटुंबासह वसईतून बेपत्ता झाल्यामुळे विकास वालकर आश्चर्यचकित झाले. अचानक घटनेमुळे त्यांच्या मनात संशयाची पाल चमकली. आपल्या मुलीसोबत काही अघटीत घडल्याचे त्यांच्या मनात वाटले. आफताबचे कुटुंब 2 दशकांपासून वसईत राहत होते. पण 11 नोव्हेंबर रोजी श्रद्धाची हत्या झाल्याचे उघड होण्यापूर्वी 2 आठवडे अगोदरच ते वसईतून पळून गेले होते. त्यांना वसईतून इतरत्र हलवण्यासाठी आफताबने मदत केली होती.

थेट दिल्लीत आफताबशी भेट झाली

पत्रकारांशी बोलताना विकास वालकर म्हणाले की, या हत्याकांडानंतर त्यांनी आफताबला थेट दिल्लीत पोलिसांच्या कोठडीत पाहिले. ते म्हणाले - पोलिसांनी आफताबच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली पाहिजे. मुलीचे दुःख सहन करणाऱ्या विकास यांच्या डोळ्याच्या कडा श्रद्धाच्या आठवणीने ओल्या होत्यात. त्यांना श्रद्धाचे स्थळ घेऊन आफताबच्या घरी गेल्याची गोष्ट आजही जशीच्या तशी आठवते. एकीकडे श्रद्धा घर सोडून आफताबसोबत राहत होती. तर दुसरीकडे, विकास यांच्या पत्नीची प्रकृती दिवसागणीक बिघडत होती. त्यामुळे त्यांनी श्रद्धाला लवकरात लवकर लग्न करण्याची सूचना केली. पण श्रद्धाने नकार दिला. हे सर्व माहिती असतानाही ते आफताबच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले. पण त्यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला.

या फोटोत श्रद्धाच्या चेहऱ्यावर आफताबने केलेल्या मारहाणीचे व्रण दिसत आहेत.आहेत.
या फोटोत श्रद्धाच्या चेहऱ्यावर आफताबने केलेल्या मारहाणीचे व्रण दिसत आहेत.आहेत.

आईच्या मृत्यूनंतर श्रद्धा लग्नास तयार झाली

विकास यांनी सांगितले की, या घटनेनंतर श्रद्धाच्या आईचे निधन झाले. त्यानंतर तिने आफताबशी लग्नाची चर्चा केली. पण तेव्हा विकासने तिला काही काळ थांबण्यास सांगितले. कारण, नुकतेच तिच्या आईचे निधन झाले होते. श्रद्धाने आफताबकडून आपल्याला मारहाण होत असल्याची बाब केव्हाच आपल्या कुटुंबीयांना सांगितली नाही. पण आपल्या मित्रांना तिने ही गोष्ट सांगितली होती. विशेषतः आफताबच्या कुटुंबीयांनाही ही गोष्ट माहिती होती. कारण श्रद्धा त्यांच्या संपर्कात होती.

मुलाच्या नोकरीचा बहाणा सांगून सोडले घर

आफताबच्या कुटुबीयांनी वसईतील घर सोडताना इमारतीमधील लोकांना आपला छोटा मुलगा असदच्या नोकरीचे कारण सांगितले. असदला मुंबईत नोकरी लागली आहे. रेल्वेने प्रवास करताना त्रास होत असल्यामुळे आम्ही मुंबईत स्थायिक होत आहोत असे त्यांनी सांगितले होते. आफताबचे वडील अमीन पूनावाला मुंबईच्या कांदिवली-मालाड भागात बुटांचे होलसेर पुरवठादार आहेत.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अमीन, आफताबच्या अटकेपासून दिल्लीतच आहेत. पण आफताबला न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा ते तिथे नव्हते. त्यांचा जबाब अद्याप नोंदवण्यात आला किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, वसईच्या माणिकपूर पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना आफताबच्या कुटुंबीयांची अद्याप कोणतीही माहिती नाही.

बातम्या आणखी आहेत...