आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shraddha Murder Pre Planned Conspiracy I Experts Do Not Agree With Aftab's Statement In Court I Latest News And Update 

श्रद्धा मर्डर पूर्वनियोजित कट:आफताबने कोर्टात दिलेल्या विधानाशी तज्ज्ञ सहमत नाहीत; म्हणाले- हा रागात केलेला गुन्हा नव्हता

नवी दिल्ली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबने मंगळवारी न्यायालयात सांगितले की, त्याने रागाच्या भरात मैत्रिण श्रद्धाची हत्या केल्याची कबूली दिली. मात्र, या विधानानंतर अनेक चर्चांना उधाण सुरू झाले आहे. रागाच्या भरात एखादा व्यक्ती शरीराचे 35 तुकडे करेल का, आणि पुढील 18 दिवस ते तुकडे कसे काय सांभाळू शकतो.

यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार तथा मानसोपचारतज्ज्ञ डॉ.संदीप वोहरा यांनी आफताबचे विधान पूर्णपणे खोटे असल्याचा दावा केला आहे. श्रद्धाची हत्या ही रागात केलेली घटना नसून तो पूर्वनियोजित कट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आफताब कोर्टात काय म्हणाला

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबने मंगळवारी न्यायालयात सांगितले की, त्याने रागाच्या भरात आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली. यावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप वोहरा यांच्याशी संवाद साधला असता. तेव्हा त्यांनी हा पूर्वनियोजित कट असल्याचे मत व्यक्त केले आहे.

रागात कृत्य करणारे आत्मसमर्पण करतात

डॉ. संदीप वोहरा म्हणाले की, रागाच्या भरात कोणी गुन्हा केला. तर काही वेळाने त्यालाही आपली चूक कळते. अनेक वेळा एका व्यक्तीने दुसऱ्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्याचे समोर आले आहे.

आफताबचे कृत्य एखादा मनोरुग्नच करू शकतो

दरम्यान, त्याचवेळी आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर पुढील काही दिवस तो पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करित होता. यावरून त्याने श्रद्धाच्या हत्येचा कट आधीच रचल्याचे स्पष्ट होते. डॉ.बोहरा म्हणाले की, हत्येनंतर आफताबने ज्या प्रकारचे काम केले ते केवळ मनोरुग्णच करू शकतो. एकादा सामान्य व्यक्ती करू शकत नाही. आफताबला आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचे दिसून येते.

छतरपूर टेकडीवर असलेल्या या हिरव्या रंगाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आफताब राहत होता. तो कोणालाही भेटला नाही. या प्रकरणापूर्वी इमारतीत राहणाऱ्या लोकांना त्याचे नावही माहित नव्हते.
छतरपूर टेकडीवर असलेल्या या हिरव्या रंगाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आफताब राहत होता. तो कोणालाही भेटला नाही. या प्रकरणापूर्वी इमारतीत राहणाऱ्या लोकांना त्याचे नावही माहित नव्हते.

आफताबच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही

​​​​​​आफताब पोलिसांसमोर वारंवार आपले वक्तव्य बदलत आहे. अशा लोकांवर विश्वास ठेवणे सर्वाधिक धोकादायक म्हणता येईल. अर्थात विधान बदलून तो पोलिसांशी दिशाभूल करित आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये श्रद्धाच्या कुटुंबीयांकडूनही साथ मिळत नव्हती. घरच्यांची साथ असती, तर ती जिवंत राहिली असती. या प्रकरणी इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या भूमिकेवर डॉ.वोहरा म्हणाले की, सोशल मीडियामुळे अशा रानटी घटना घडू शकतात. आफताबसारखे लोक स्वभावाने गुन्हेगार आहेत. त्यामुळेच जेव्हा श्रद्धाने घर सोडण्यास सांगितले. तेव्हा त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली. तो अनेकदा श्रद्धाला मारहाण करायचा.

श्रद्धाने तिच्या मित्राला पाठवलेला फोटो असून यावर तिच्या चेहऱ्यावर मारहाण झाल्याचे दिसून येत आहे.
श्रद्धाने तिच्या मित्राला पाठवलेला फोटो असून यावर तिच्या चेहऱ्यावर मारहाण झाल्याचे दिसून येत आहे.

आफताब-श्रद्धा 8 मे रोजी दिल्लीत, 18 रोजी केली हत्या
आफताब-श्रद्धा 8 मे रोजी मुंबईहून दिल्लीला आले. इथून पहाडगंजच्या हॉटेल्समध्ये आणि नंतर दक्षिण दिल्लीत राहू लागले. दक्षिण दिल्लीनंतर त्यांनी मेहरौलीच्या जंगलाजवळ फ्लॅट घेतला होता. 18 मे रोजी 10 दिवसांनी 28 वर्षीय आफताबने श्रद्धाची हत्या केली. तिचे 35 तुकडे केले. जे त्याने सुमारे तीन आठवडे 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर तो दररोज हे तुकडे मेहरौलीच्या जंगलात फेकण्यासाठी जात असे. घटनेपूर्वी आफताबने अमेरिकन क्राईम शो डेक्सटरसह अनेक गुन्हेगारी चित्रपट आणि शो पाहिले होते.

बातम्या आणखी आहेत...