आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवघ्या देशाचे समाजमन सुन्न करणाऱ्या श्रद्धा हत्याकांडाप्रकरणी दिल्ली पोलिसांना गुरुवारी मोठे यश मिळाले. ANIच्या वृत्तानुसार, महरौली व गुरुग्रामच्या जंगलात आढळलेल्या हाडांचा DNA श्रद्धाच्या वडिलांशी मॅच झाला आहे. यामुळे ही हाडे श्रद्धाचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, 28 वर्षीय आफताबने 18 मे रोजी 27 वर्षीय श्रद्धा वालकरची हत्या केली होती. दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत होते. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले होते. ते ठेवण्यासाठी त्याने 300 लीटरचा फ्रिज खरेदी केले होते. तो सलग 18 दिवस मध्यरात्री 2 च्या सुमारास मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी जंगलात जात होता.
आफताबने नार्को व पॉलीग्राफ टेस्टमध्ये स्वीकारली होती हत्येची गोष्ट
गत महिन्यात आफताबची नार्को टेस्ट करण्यात आली होती. त्यात त्याने श्रद्धाची हत्या केल्याची बाब कबूल केली होती. दिल्लीच्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात सलग 2 तास आफताबची नार्को टेस्ट झाली. त्यात विचारण्यात आलेल्या बहुतांश प्रश्नांना त्याने इंग्रजीत उत्तर दिले. त्याने पॉलीग्राफ टेस्टमध्येही श्रद्धाच्या हत्येची गोष्ट कबूल केली होती. तसेच आपल्याला या प्रकरणी कोणताही पश्चाताप होत नसल्याचेही स्पष्ट केले होते.
आफताबवर झाला होता हल्ला
रोहिणी FSLमध्ये पॉलीग्राफ टेस्टसाठी जाताना आफताबवर हल्ला झाला होता. आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर रोहिणी स्थित न्यायवैद्यक प्रयोगशाळेबाहेर (FSL) 4-5 जणांनी हल्ला केला होता. त्यांच्या हातांत तलवारी होत्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आफताबला वाचवले होते.
12 नोव्हेंबर रोजी आफताबला अटक
आफताबला गत 12 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले. 17 नोव्हेंबर रोजी त्याची कोठडी आणखी 5 दिवसांसाठी वाढवण्यात आली. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी कोर्टाने त्याची रवानगी 13 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत केली. 9 डिसेंबर रोजी दिल्लीच्या साकेत कोर्टात व्हिसीद्वारे हजर करण्यात आले. PTIच्या वृत्तानुसार, कोर्टाने आफताबच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.
काय आहे प्रकरण
आफताब पूनावालाने 18 मे रोजी 27 वर्षीय श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून ते दक्षिण दिल्लीच्या महरौली स्थित आपल्या घरातील फ्रिजमध्ये ठेवले. हे तुकडे तो अनेक दिवसांपर्यंत मध्यरात्रीनंतर शहराच्या विविध भागांत जाऊन फेकत होता. दरम्यान, दिल्लीच्या एका न्यायालयाने पोलिसांना आफताबवर थर्ड डिग्रीचा वापर करण्यास मनाई केली आहे.
श्रद्धाची तक्रार हाच सर्वात मोठा पुरावा
निर्भयाला न्याय मिळण्यासाठी 7 वर्षे लागली, त्यात श्रद्धाचे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये कोणीही प्रत्यक्षदर्शी नाही. तसेच पीडितेचा कोणताही जबाब नाही. अशा परिस्थितीत श्रद्धाला न्याय मिळवून देणे किती आव्हानात्मक असेल हे जाणून घेण्यासाठी दैनिक दिव्य मराठी नेटवर्कने निर्भयाला न्याय मिळवून देणाऱ्या वकील सीमा कुशवाह यांच्याशी खास बातचीत केली. तुम्ही येथे क्लिक करून जाणून घ्या त्या काय म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.