आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shraddha Walkar Murder Case Updates | Aaftab Post narco Session Don, Chinese Chopper In Gurugram | Marathi New

आफताबने चिनी चॉपरने श्रद्धाचे तुकडे केले:चॉपर गुरुग्राममध्ये तर डोके मेहरौलीच्या जंगलात फेकले, 2 तास चालली नार्को टेस्ट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने सर्व चाचण्यांमध्ये समान उत्तरे दिली आहेत. पीटीआयने शुक्रवारी पोलिस सूत्रांचा हवाला देऊन सांगितले की, पूनावालाचे कबुलीजबाब, पॉलीग्राफ आणि नार्को टेस्टमधील उत्तरे सारखी आहेत. दोन्ही चाचण्यांमध्ये त्याने हत्येची कबुली दिली आहे.

चिनी चॉपरने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चाचणीदरम्यान आफताबने सांगितले की, त्याने श्रद्धाच्या शरीराचे चिनी चॉपरने तुकडे केले होते. नंतर चॉपर गुरुग्राममधील त्याच्या ऑफिसजवळील झुडपात कुठेतरी फेकून दिले होते. दुसरीकडे, मेहरौलीच्या जंगलातच श्रद्धाचे डोके फेकण्यात आले. त्याने श्राद्धाचा फोन मुंबईतील समुद्रात फेकल्याचीही माहिती दिली. पोलिसांना अद्याप फोन मिळालेला नाही.

2 तास चालली नार्को टेस्ट
आरोपी आफताबची पोस्ट नार्को चाचणीही शुक्रवारी पूर्ण झाली आहे. 'पोस्ट नार्को टेस्ट इंटरव्ह्यू' दरम्यान फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) टीमने त्याची सुमारे 2 तास चौकशी केली. यापूर्वी नार्को चाचणीची मुलाखत एफएसएल कार्यालयात होणार होती, परंतु आफताबच्या सुरक्षेचा विचार करून टीमने तिहार तुरुंगातच चाचणी घेण्याचा निर्णय घेतला.

श्रद्धाचा डीएनए रिपोर्ट पुढील आठवड्यात येणार
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाचा डीएनए रिपोर्ट पुढील आठवड्यापर्यंत येईल. मात्र, पोलिसांना अद्याप श्रद्धाचे शीर सापडलेले नाही. यासोबतच तिच्या शरीराच्या इतर अवयवांचाही शोध सुरू आहे.

आफताबच्या चौकशीशी संबंधित 3 महत्त्वाच्या गोष्टी...

1. ब्रेन मॅपिंग देखील होऊ शकते
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FS) टीमने नार्को चाचणीची तयारी पूर्ण केली आहे. नार्को चाचणीवेळी एफएसएल टीमसोबत डॉक्टरही उपस्थित राहणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, जर नार्को टेस्टमधून काही निष्पन्न झाले नाही तर, पोलिस आफताबच्या ब्रेन मॅपिंग टेस्टचीही मागणी करू शकतात.

2. आफताब सर्व काही मान्य करत होता, इथेच संशय अधिक वाढला
तपासात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आफताब खूप हुशार आहे आणि केव्हाही या प्रकरणात नवीन वळण आणू शकतो. आतापर्यंत तो पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करत आहे. पॉलीग्राफ आणि नार्को टेस्टसाठीही तयार झाला आहे. त्याचवेळी त्याच्या चांगल्या वागणुकीवर पोलिसांना संशय येत आहे.

3. चौकशीदरम्यान आफताब खूप कॉन्फिडन्ट होता
चौकशीदरम्यान आफताब खूप कॉन्फिडन्ट असल्याचेही पोलिस सूत्रांकडून समजले आहे. जेव्हा त्याला प्रश्न विचारला जातो तेव्हा तो उत्तरे खूप फास्ट आणि रिलॅक्स देतो. यावरून तो सर्वकाही प्लॅननुसार उत्तर देत असल्याचे दिसून येते. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आफताबला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते, तेव्हा श्रद्धाच्या शरीराचे काही अवयव त्याच्या दिल्लीतील फ्लॅटमध्ये होते असाही पोलिसांना संशय आहे.

पॉलीग्राफ चाचणीचा निकाल- आफताबने खुनाची कबुली दिली, पण पश्चाताप नाही
आफताबची पॉलीग्राफ चाचणी पूर्ण झाली असून त्याचा अंतिम अहवाल तयार केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चौकशीदरम्यान आफताबने आपणच श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच श्रध्दाच्या हत्येचा त्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे म्हटले.

  • मीडिया रिपोर्ट्समध्ये चाचणी टीमशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, आफताबने हत्येनंतर मृतदेह जंगलात फेकल्याची वस्तुस्थिती स्वीकारली आहे.
  • त्याने सांगितले की त्याने डेटिंग अॅपच्या माध्यमातून अनेक मुलींशी मैत्री केली.
  • श्रद्धाच्या हत्येपूर्वी आणि त्यानंतरही त्याचे इतर मुलींशी संबंध होते.
बातम्या आणखी आहेत...