आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shraddha Walker Delhi Murder Aftab Case Top 3 Updates Today, Latest News And Update

आफताब पूनावाला झाला 'गजनी':म्हणाला - बस्स एवढेच आठवते; प्रेयसी श्रद्धाच्या मृतदेहाचे केले होते तब्बल 35 तुकडे

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्या भारताचे समाजमन सुन्न करणाऱ्या श्रद्धा हत्याकांडात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. श्रद्धाचे तब्बल 35 तुकडे करून ते जंगलात फेकणारा आफताब पूनावाला आता गजनी चित्रपटातील अभिनेत्यासारखा अभिनय करत आहे. त्याची मंगळवारी न्यायालयात ऑनलाइन पेशी झाली. त्यात त्याने हे सर्वकाही रागाच्या भरात घडल्याचे सांगितले. तसेच ही 6 महिन्यांपूर्वीची घटना आता आपल्याला फारशी आठवत नसल्याचेही तो म्हणाला.

न्याय मंदिरात मंगळवारी तो अनेक गोष्टी आठवत म्हणाला, 'श्रद्धाने चिथावणी दिली. त्यामुळे हे सर्वकाही घडले.' पण त्याच्या या कबुलीजबाबामागे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कदाचित तो हे प्रकरण सदोष मनुष्यवधाचे असल्याचे सांगून आपली शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न करत असावा. आफताबच्या मंजुरीवर कोर्टाचा शिक्कामोर्तब होताच त्याची पॉलिग्राफ टेस्ट होऊ शकते. त्यानंतर त्याची नार्को टेस्टही होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया हा चर्चित हत्याकांडाचे आजचे 3 मोठे अपडेट्स.

1. करवत झाडीत, चाकूचे लोकेशन कचरापेटी

आफताबने आज कोर्टात श्रद्धा हत्याकांडात वापरलेल्या शस्त्रांच्या लोकेशनची माहितीही दिली. त्याने न्ययायाधीशांना सांगितले की, मी पोलिसांना तपासात सहकार्य आहे. गुरुग्राम डीएलएफ फेज-3 मधील झाडीत मी या प्रकरणातील करवत फेकले होते. तर महरौलीच्या 100 फूट रोडवरील कचरापेटीत चाकू फेकला होता. यासंबंधीच्या वृत्तानुसार, आरोपीने आपणच श्रद्धाची हत्या केल्याचेही मान्य केले आहे. तसेच तिच्या शरीराचे तुकडे महरौलीच्या जंगलासह अन्यत्र फेकल्याचेही कबूल केले आहे. पोलिस आता या प्रकरणातील करवत, हातोडा, चाकू व ब्लेडचा शोध घेत आहेत. आफताबने कवडी व जबडा तोडण्यासाठी खिला व हातोड्याचा वापर केल्याचे सांगितले जात आहे.

​​2. तो जबडा श्रद्धाचा?

पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने दिल्लीच्या मैदानगडीच्या तलावातून हाडे जप्त केली आहे. ते तपासासाठी CFSLकडे पाठवण्यात आले आहे. पोलिस या तलावात श्रद्दाच्या कवटीचे इतर भाग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, आफताबच्या फ्लॅटच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग आढळलेत. श्रद्धा हत्याकांडाच्या तपास अधिकाऱ्यांचा दाखला देत काही वृत्तांमध्ये अनेक हाडे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

तपास अधिकाऱ्यांनी कवटीचा जबडा आढळल्याचाही दावा केला आहे. शरीराचा हा भाग गत 20 तारखेला आढळला होता. घटना घडलेल्या फ्लॅटच्या किचनमध्येही काही महत्त्वाचे पुरावे आढळलेत. एवढेच नाही तर एक नकाशाही जप्त करण्यात आला आहे. हा नकाशा श्रद्धाच्या बॉडीचे तुकडे फेकण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे. मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी आपण रात्रीच्या वेळी जात होतो, त्यामुळे ते नेमके कुठे फेकले हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, असेही तो म्हणत असल्याचे सांगितले जात आहे.

आफताबचे वकील काय म्हणाले?

आफताबचे वकील के. कुमार यांनी सांगितले की, 'आफताबला सर्व गोष्टी एकाचवेळी आठवणे शक्य नाही. तो त्याला जसे आठवेल तसे तो पोलिसांना सांगेल. त्याने मृत तरुणीसाठी एका शब्दाचा वापर केला. तिने त्याला चिथावणी दिल्याचे तो म्हणाला आहे. पुरावे गोळा करण्यासाठी पोलिस त्याला साइटवर घेऊन जातील. नार्को टेस्टही लवकरच होईल.'

आफताबचे वकील के. कुमार.
आफताबचे वकील के. कुमार.

​​3. 4 दिवसांची वाढीव पोलिस कोठडी

दिल्ली न्यायालयाने मंगळवारी आफताबच्या पोलिस कोठडीत 4 दिवसांची वाढ केली. या कोठडीमुळे या प्रकरणातील पुरावे गोळा करण्यास मदत होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. आफताबला 12 नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी महरौलीच्या भाड्याच्या फ्लॅटमधून श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. आता त्यांना पुढील 4 दिवसांत आफताबची चौकशी करून या प्रकरणाचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. असे झाले तर त्यांना आफताबची आणखी वाढीव कोठडी मिळू शकते.

आफताब व श्रद्धाचे छायाचित्र.
आफताब व श्रद्धाचे छायाचित्र.

CBI चौकशीची मागणी करणाऱ्याला दंड

दिल्ली हाय कोर्टाने श्रद्धा हत्याकांडाचा तपास दिल्ली पोलिसांकडून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणारी फेटाळून लावली आहे. कोर्टाने ही जनहित नव्हे तर प्रचारहित याचिका असल्याचे नमूद केले. तसेच याचिकाकर्त्याला दंडही ठोठावला. पण दंडाची रकम अद्याप स्पष्ट झाली नाही. मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा व न्यायमूर्ती सुब्रह्मण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने प्रस्तुत याचिकेतील एकही मुद्दा योग्य नसल्याचे सांगितले आहे. मृतदेहाचे तुकडे आढळलेल्या ठिकाणी मीडिया व इतर लोकांच्या उपस्थितीमुळे पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...