आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धा वालकर हत्‍याकांड:आफताबच्या फ्लॅटमधून 5 धारदार सुरे केले जप्त

नवी दिल्ली2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा वालकरची निर्घृण हत्या करून तिचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाच्या छत्तरपूर येथील फ्लॅटमधून दिल्ली पोलिसांनी पाच धारदार सुरे जप्त केले. गुरुवारी जप्त केलेेले सुरे हत्याकांडात वापरले होते किंवा कसे याची पडताळणी करण्यासाठी ते रासायनिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, श्रद्धाच्या मारेकऱ्यास शक्य तितक्या लवकर कठोर शिक्षा होईल याची खबरदारी दिल्ली पोलिस आणि सरकारी वकील घेतील, अशी ग्वाही गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

इकडे, दिल्ली पोलिसांच्या पथकाने भाईंदरच्या खाडीत मोबाइल फोनचा शोध घेतला. आठवडाभरापासून हे पथक वसईत तळ ठोकून आहे.

बातम्या आणखी आहेत...