आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धा वालकर हत्याकांड:आफताबची नार्को चाचणी टळली, आधी पॉलिग्राफ

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास करणारे पोलिस संभ्रमात आहेत. या प्रकरणात पुरावे जमा करण्याच्या नादात पोलिसांना कायदेशीर प्रक्रियेचा विसर पडला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी आरोपी आफताबची नार्को चाचणी करण्यासाठी साकेत न्यायालयाकडून परवानगी घेतली. पाच दिवसांच्या आत कोर्टाने आरोपीची नार्को चाचणी करण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी ही चाचणी करण्याआधी प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांना सांगितले की, नार्काे चाचणीआधी आरोपीची पॉलिग्राफ चाचणी करण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सोमवारी तत्काळ पुन्हा एकदा कोर्टात धाव घेतली. पोलिसांना आता या चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...