आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shraddha Walker Murder Mystery I Victims Letter To Mumbai Police Before Murder | Delhi Mehrauli Latest News  

श्रद्धाने 2 वर्षांपूर्वी सांगितले होते, आफताब मारून टाकेल:मुंबई पोलिसांना लिहले होते पत्र; म्हणाली- कारवाई झाली नाही, तर माझे तुकडे होईल

नवी दिल्ली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन वर्षांपूर्वी श्रद्धाने पालघर पोलिसांना पत्र लिहले होते, त्यात तिने आफताबवर कारवाई केली नाही तर तो मला मारून टाकेल असे म्हटले होते.

श्रद्धा हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. बुधवारी आणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांकडे आफताबच्या हिंसक वागणुकीची तक्रार केली होती. अशी माहिती माध्यमांद्वारे सांगितली जात आहे.

माध्यमांच्या दाव्यानुसार, श्रद्धाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबईतील पालघर पोलिसांना पत्र लिहिले होते. तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब तिला मारहाण करायचा, असे तिने पोलिसांना पत्रात सांगितले होते. वेळीच कारवाई न झाल्यास आफताब तिला मारून टाकेल. असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, असा दावा देखील केला जात आहे की, श्रद्धाने आफताबच्या वागणुकीबाबत तिच्या घरच्यांना देखील सांगितले होते. पण त्यांनी काहीही केले नाही.

प्रसारमाध्यमांमध्ये आलेले श्रद्धाचे पूर्ण पत्र वाचा...

माझे नाव श्रद्धा वालकर आहे. मी 25 वर्षांची आहे. मला 26 वर्षीय आफताब अमीन पूनावालाची तक्रार करायची आहे. तो रिगल अपार्टमेंट, विजय नगर कॉम्प्लेक्समध्ये राहतो. तो मला शिवीगाळ करून मारहाण करतो. आज त्याने माझा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तो मला ठार मारून तुकडे तुकडे करीन अशी धमकी देत आहे.ब्लॅकमेल करत आहे. तो मला गेल्या 6 महिन्यांपासून मारहाण करत आहे, पण मी त्याची पोलीसात तक्रार करण्याचे धाडस केले नाही. कारण मला तो जीवे मारण्याची धमकी देत होता.

आफताबच्या कुटुंबीयांनाही माहीत आहे की, तो मला मारहाण करायचा आणि जीवे मारण्याचाही प्रयत्न करायचा. आम्ही एकत्र राहतो हे त्याच्या कुटुंबियांना माहीत आहे. आणि तेही वीकेंडला भेटायला येतात. मी आजपर्यंत त्याच्यासोबत राहते, कारण आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. त्याच्या घरच्यांनीही होकार दिला आहे. पण मला आता त्याच्यासोबत राहायचे नाही.

श्रद्धाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबईतील पालघर पोलिसांना पत्र लिहिले.
श्रद्धाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबईतील पालघर पोलिसांना पत्र लिहिले.

श्रद्धा हत्याकांडातील अपडेट

  • दिल्ली पोलिसांनी बुधवारी मुंबईत जाऊन श्रद्धाच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले. श्रद्धा आणि आफताबच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले आहेत.
  • आफताबची पॉलीग्राफी चाचणी मंगळवारी रोहिणी फॉरेन्सिक लॅबमध्ये सुरू झाली. ही प्रक्रिया सुमारे एक आठवडा चालेल.
  • दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई गुन्हे शाखेत आफताबच्या तीन मित्रांचे जबाब नोंदवले. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 17 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केली होती.

आणखी एक पुरावा मिळाला

आफताबच्या बाथरूमच्या टाइल्समधून दिल्ली पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी हे पुरावे मिळवले आहेत. पुरावे काय आहेत, हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. यापूर्वी आफताबच्या बाथरुमच्या टाइल्सवरही रक्ताचे निशाण आढळून आले होते. तज्ञांचा अहवाल यायला २ आठवडे लागतील.

आखणी एक दावा करण्याता आला

आफताबने न्यायालयात गुन्ह्याची कबुली दिली, याला वकिलाने नकार दिला आहे. आफताबने न्यायालयात हत्येची कबुली दिली असल्याचा दावा कायदेशीर वृत्त वेबसाइट बार अँड बेंच आणि इतर काही माध्यमांनी केला आहे. त्याने चिथावणी आणि रागातून श्रद्धाची हत्या केल्याचे न्यायाधीशांना सांगितले. तसेच मी पोलिसांना सर्व काही सांगितल्याचे सांगितले. आता ती घटना आठवणे मला कठीण असल्याचे आफताब म्हणाला होता.

हे वृत्त समोर आल्यानंतर सुमारे तासाभरात आफताबचे वकील अविनाश कुमार यांनी हत्येची कबुली अफवा असल्याचे म्हटले. ते माध्यमांसमोर म्हणाले की, आफताबने अशी कोणतीही कबुली दिलेली नाही. असे कोणतेही निवेदन रेकॉर्डवर घेतलेले नाही. होय, तो नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करत होता. की श्रद्धा त्याला भडकवायची आणि दोघांमध्ये भांडणे व्हायची.

बातम्या आणखी आहेत...