आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shramik Trains Railway Minister Piyush Goyal Updates | Pregnant Women, Children Avoid From Travelling In Shramik Train

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीवघेणा रेल्वे प्रवास:रेल्वेची कठोर अपील - गरोदर महिला आणि लहान मुलांनी रेल्वेतून प्रवास करू नये; प्रश्न- या गाड्यांमध्ये लोक फिरायला निघाले आहेत का? पत्नी व मुलांना सोडून कामगार घरी कसे परत येतील?

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे विभागाने शुक्रवारी एक विचीत्र अपील केली आहे. त्यात म्हटले की- ‘आधीपासून आजारी असलेले लोक, गरोदर महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे मुलं आणि वृद्धांनी श्रमिक ट्रेनमधून प्रवास करू नये.’ या अपीलनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयलदेखील समोर आले.

रेल्वे मंत्र्यांनी ट्वीट करुन हेच परत सांगितले. फक्त आपल्या अधिकाऱ्यांच्या गोष्टी सुधारल्या. म्हणाले- ‘गरज असेल, तरच प्रवास करा.’ पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे, या श्रमित ट्रेनमध्ये प्रवास कोण करत आहे? उत्तर आहे, गरीब आणि मजबूर लोक. तर मग त्यांनी आपल्या कुटुंबाला सोडून जायंच का? 

रेल्वे आणि मंत्र्यांची अपील तेव्हा समोर आली आहे, जेव्हा घरी जात असलेल्या मजुरांचा आणि त्यांच्या पोरा-बाळांचा मृत्यू होत आहे. मागील 48 तासात श्रमिक ट्रेनमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. जे मजूर लॉकडाउनमुळे मागील दोन महिन्यांपासून परराज्यात अडकले आहेत, ते आपल्या घरातील महिला, मुले आणि वृद्धांना सोडून प्रवास कसा करू शकतील ? 

या मजुरांसाठी श्रमिक ट्रेन, एक मे पासून सुरू झाल्या. गुरुवारी प्रवाशांच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावनी झाली, तेव्हा सरकारने दावा केला आहे. 27 दिवसात 91 लाख नागरिकांना त्यांच्या गृह राज्यात पाठवण्यात आले. पण, मुंबई, दिल्लीच्या रेल्वे आणि बस स्थानकांवरील गर्दी पाहून समजते की, अद्यापही हजारो मजूर अडकले आहेत.

रेल्वे मंत्र्यांनी ट्वीट केले

रेल्वेने कबुल केले- काही मृत्यू झाले

रेल्वेने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले की, ट्रेनमध्ये काही असे लोकदेखील प्रवास करत आहे, ज्यांना आधीपासून काहीतरी आजार आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे. आधीपासून आजारी असलेल्या काही लोकांचा मृत्यूही झाल्याचे समोर आले आहे. पुढे रेल्वे विभागाकडून अपील करण्यात आली की, 'हायपरटेंशन, डायबिटीज, ह्रदय संबंधी आजार, कँसर, कमकुवत इम्यून सिस्टीमसारख्या आजारांनी ग्रस्त असलेले. तसेच, गरोदर महिला, 10 वर्षापेक्षा कमी वयाची मुले आणि वृद्धांना रेल्वे विभाग अपील करतो की, त्यांनी गरजेचे असेल, तरच प्रवास करावा.'

बातम्या आणखी आहेत...