आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावा:तिरुमलाच्या आंजनेद्री डोंगरावर श्री हनुमानाचा जन्म; अयोध्येच्या धर्तीवर होणार जन्मस्थानाचा विकास

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वीलेखक: अनिरुद्ध शर्मा
  • कॉपी लिंक
  • तिरुमला ट्रस्टच्या तज्ज्ञ समितीचा अहवाल, रामनवमीला जाहीर करणार

आंध्र प्रदेशात तिरुमलातील सात डोंगररांगांपैकी एक आंजनेंद्री डोंगरावरच आंजनेय स्वामी अर्थात श्री हनुमानाचे जनस्थळ आहे. जन्मस्थळ निश्चित करण्यासाठी तिरुमला देवस्थानम ट्रस्टने (टीटीडी) डिसेंबर २०२० मध्ये नियुक्त केलेल्या समितीने आपल्या अहवालात हे नमूद केले आहे. येत्या २१ एप्रिल रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर पुस्तकाच्या स्वरूपात हा अहवाल प्रकाशित करण्यात येणार आहे.

टीटीडीचे कार्यकारी अधिकारी डॉ. केएस जवाहर रेड्‌डी म्हणाले की, आता देशवासीयांनी श्री हनुमानाचे जन्मस्थळ निश्चित करण्याची वेळ आली आहे. श्रीरामाचे जन्मस्थळ निश्चित झाल्यानंतर अयोध्येत भव्य मंदिराची उभारणी होत आहे. त्याच धर्तीवर तिरुमलाच्या या डोंगरावर आकाशंगगा तीर्थनजीक श्री हनुमानाचे जन्मस्थळ विकसित करण्याची योजना आहे. समितीच्या अहवालात यासंदर्भातील पुरावेही देण्यात आले आहेत. यात तिरुमला मंदिरासमोरील बेडी हनुमान मंदिराचाही उल्लेख आहे. विशेष म्हणजे गतवर्षीपासून या ठिकाणी दररोज वाल्मीकी रामायणातील सुंदरकांडाचे पठणही सुरू केले आहे.

समितीमधील एका सदस्याने ‘दैनिक भास्कर’शी बोलताना सांगितले की, तिरुमलाच्या सुमारे एक हजार किमीपेक्षा अधिक क्षेत्रातील अनेक भागांना अंजनी डोंगर अथवा अंजना गुफा म्हणून ओळखले जाते. मारुतीच्या मातेचे नाव अंजनी असल्याने स्थानिक लोक याला हनुमानाचे जन्मस्थान मानतात. परंतु आंजनेद्री डोंगर हेच मारुतीचे जन्मस्थळ आहे. तिरुमला डोंगरावरूनच सध्या श्री हनुमानाचे दर्शन घ्यावे लागते.

नाशिक, हम्पी, डांगसह अनेक शहरांचाही दावा
हम्पीमधील (कर्नाटक) अंजनेरी डोंगरासही मारुतीचे जन्मस्थळ मानले जाते. इथे २२१ मीटर उंच जगातील सर्वात मोठी हनुमानाची भव्य मूर्ती बनवली जात आहे. याशिवाय महाराष्ट्रातील नाशिक, झारखंडमधील गुमलाचे अंजन गाव, राजस्थानात चुरू येथील सुजानगड, हरियाणाच्या कैथल आणि गुजरातमधील डांग जिल्ह्यातील एका स्थानासही जन्मस्थळ मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...