आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shri Ram Bhumi Trust Updates: Aam Aadmi Party Accuses Shriram Janmabhoomi Tirtha Trust Of Scam; News And Live Updates

आरोप:पाच मिनिटांपूर्वी 2 कोटीत विकलेली जमीन ट्रस्टने 18.5 कोटी रुपयांत खरेदी केली; श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टवर आम आदमी पार्टीने केला घोटाळ्याचा आरोप

लखनऊ/अयोध्या4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1.2 एकर जमिनीचे दोन्ही सौदे 18 मार्चला झाले

अयोध्येत राममंदिराची उभारणी करत असलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने जमीन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ‘आप’ नेते संजय सिंह आणि सपाचे नेते पवन पांडेय यांनी केला आहे. पाच मिनिटांपूर्वी जी जमीन दोन कोटीत विकली गेली तीच जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली, असा आरोप करण्यात आला आहे.

संजय सिंह रविवारी लखनऊ येथे म्हणाले की, ‘ट्रस्टने १८ मार्च रोजी १८.५ कोटीत सुलतान अन्सारी आणि रविमोहन तिवारी यांच्याकडून जमीन खरेदी केली. हीच जमीन ५ मिनिटांपूर्वी हरीश पाठक व कुसुम पाठकांकडून २ कोटी रुपयांत खरेदी करण्यात आली होती. केवळ ५ मिनिटांत ही जमीन १६.५ कोटींनी महाग झाली. भाविकांच्या दानाची ही सर्रास लूट आहे. या दोन्ही व्यवहारांत डॉ. अनिल मिश्रा साक्षीदार आहेत.’ रजिस्ट्रीचा ई-स्टॅम्प ५.११ वाजता खरेदी केला गेला.

जेव्हा की रविमोहन तिवारी यांनी ही जमीन हरीश पाठकांकडून खरेदी केली त्याचा ई-स्टॅम्प ५.२२ वाजता खरेदी केला गेला. ट्रस्टने जमीन खरेदीसाठी आधीच ई-स्टॅम्प कसा खरेदी केला, असा सवालही त्यांनी केला. पवन पांडेय म्हणाले की, ‘जमिनीसाठी ट्रस्टने १७ कोटींचे आरटीजीएस केले. हे पैसे कुणा कुणाच्या खात्यात जमा झाले, याची चौकशी व्हावी. लोकांच्या धार्मिक भावनांशी विश्वासघात करणाऱ्यांची ईडी व सबीआय चौकशी व्हावी.

हा कसा योगायोग? जमिनीच्या दोन्ही सोद्यात डॉ. अनिल मिश्राच बनले साक्षीदार
सुरुवातीला ही जमीन हरीश पाठक, कुसुम पाठक यांच्याकडून सुलतान अन्सारी व रविमोहन तिवारी यांनी खरेदी केली तेव्हा साक्षीदार क्र. १ म्हणून डॉ. अनिल मिश्रा होते. डॉ. मिश्रा श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे विश्वस्त आहेत. कोणत्याही धनादेशावर डॉ. मिश्रा हेच साईनिंग अॅथॉरिटी आहेत. अन्सारी-तिवारी यांनी जमीन श्री राम जन्मभूमी ट्रस्टला विकली तेव्हा डॉ. मिश्रा साक्षीदार क्र. २ बनले. यासंदर्भात माध्यम प्रतिनिधी त्यांची बाजू जाणून घेण्यास उत्सुक होते. मात्र डॉ. मिश्रांनी धावतच कार गाठली.

हा कसा योगायोग? जमिनीच्या दोन्ही सोद्यात डॉ. अनिल मिश्राच बनले साक्षीदार
हा कसा योगायोग? जमिनीच्या दोन्ही सोद्यात डॉ. अनिल मिश्राच बनले साक्षीदार

संत नाराज, म्हणाले- आरोपांची लवकर चौकशी व्हावी
अयोध्या हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी म्हटले की, हे प्रकरण श्रीरामांशी निगडित आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. जो कोणी दोषी आढळला त्याला सोडू नये. परंतु चौकशीअंती संजय सिंह योग्य ठरले नाही तर मी त्यांच्यावर ५० हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठाेकेन. राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटले की, या आरोपांची चौकशी लवकर होऊन वास्तव लोकांसमोर यावे.

चंपत राय म्हणाले, आमच्यावर तर गांधी हत्येचाही आराेप हाेता
रविवारी झालेल्या ट्रस्टच्या बैठकीनंतर महासचिव चंपत राय सामोरे आले. त्यांनी माध्यमांना सांगितले की, ‘बैठकीशिवाय अन्य प्रश्न विचारला तर मी निघून जाईल.’ पण वारंवार विचारल्यानंतर ते म्हणाले की, ‘आमच्यावर महत्मा गांधींच्या हत्येचाही आरोप लावला गेला हाेता. आमच्यावर तर आरोप लागतच असतात.’ दस्तऐवजांसह आरोप झाल्याचे सांगताच त्यांनी ‘होय, मला माहीत आहे. मी अभ्यास करूनच यावर बोलन.’

बातम्या आणखी आहेत...