आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shri Ram Will Be Enthroned In The Temple After 21 Months; Expected To Be Ready By December 2023

श्री रामजन्मभूमीच्या गाभाऱ्याचे भव्य मॉडेल:21 महिन्यांनंतर गाभाऱ्यात विराजमान होतील रामलल्ला, डिसेंबर 2023 पर्यंत मंदिर तयार होण्याची अपेक्षा

अयोध्या4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचे हे अंदाजित चित्र वास्तुविशारद सीबी सोमपुरा आणि मंदिराच्या बांधकामाशी संबंधित यंत्रणांनी तयार केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सुमारे 4 महिने आधी डिसेंबर 2023 पर्यंत मंदिर तयार होण्याची अपेक्षा आहे. तात्पुरत्या मंदिरातून या गर्भगृहात श्री रामलल्लाची स्थापना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य यजमान असतील.. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, मंदिराचे खांब आणि दगड उभे करण्याचे काम येत्या जुन महिन्यापासुन सुरु होईल.

गाभाऱ्यात जाण्यासाठी मुख्य दरवाजापासून 21 फूट पायऱ्या चढून जावे लागणार
गाभाऱ्यात अगदी समोर, विशाल मंडपाच्या खांबांमध्ये, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या भावांसह श्री रामाचे बालस्वरूप आहेत. गाभाऱ्यात जाण्यासाठी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायऱ्या चढून जावे लागेल असे देखील ट्रस्टने सांगतले आहे.

मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्याने सांगितले की, मंदिराच्या 50 खोल पायावरील 21 फूट उंचीच्या मंडपाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. सात पदरी प्लिंथचे काम अद्याप अजून बाकी आहे. उर्वरित प्लिंथचे काम जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार दररोज सुमारे 80 ते 100 दगड टाकले जात आहेत.

दरम्यान एका अंदाजानुसार एका दिवसात एक लाख राम भक्त मंदिरात पोहोचू शकतील असे देखील ट्रस्टने सांगितले. हे लक्षात घेऊन मंदिराच्या मॉडेलमध्ये बदल करण्यात आला आहे. हे नागारा शैलीत बांधलेले अष्टकोनी मंदिर असेल. त्यात रामाची मूर्ती आणि राम दरबार असेल. मुख्य मंदिराच्या समोर आणि मागे सीता, लक्ष्मण, भरत आणि गणेशाची मंदिरे असतील.

बातम्या आणखी आहेत...