आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:श्रीपद्मनाभस्वामी मंदिर आर्थिक अडचणीत, मंदिराच्या प्रशासकीय समितीने सुप्रीम कोर्टाला दिली माहिती

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केरळातील श्रीपद्मनाभस्वामी मंदिर आर्थिक चणचणीचा सामना करत असल्याची माहिती मंदिराच्या प्रशासकीय समितीने शुक्रवारी सुप्रीम कोर्टात दिली. समितीने सांगितले की, “केरळातील सर्व मंदिरे बंद आहेत. मंदिराचा मासिक खर्च १.२५ कोटी रुपये आहे. मात्र या काळात महत्प्रयासाने ६०-७० लाख रुपयेच मिळत आहेत. यामुळे कोर्टाने दिशानिर्देश दिले पाहिजे.’

मंदिर समितीने म्हटले की, कोर्टाच्या आदेशान्वये ट्रस्टची स्थापना झाली. कोर्टाने मंदिरात योगदान दिले पाहिजे. ट्रस्टने म्हटले की, ‘ही राजघराण्याकडून स्थापित सार्वजनिक ट्रस्ट आहे. त्याची स्थापना मंदिरात घराण्याकडून होणाऱ्या पूजा व अनुष्ठानांच्या देखरेखीसाठी होती. तिची प्रशासनात काहीही भूमिका नाही. ट्रस्टच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याच्या न्यायमित्रांच्या मागणीनंतर कोर्टापुढे ट्रस्टचा उल्लेख करण्यात आला.’ सुप्रीम कोर्टाने केरळ हायकोर्टाचा २०११ मधील निकाल फिरवला होता. त्यात राज्य सरकारला मंदिराचे व्यवस्थापन व मालमत्तांचे नियंत्रण घेण्यासाठी ट्रस्टच्या स्थापनेचा आदेश देण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...