आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shriram Janmabhoomi Trust's Land Dispute The Future Of Champat Rai And Anil Mishra Will Be Decided At The Team's July 12 Meeting

श्रीराम जन्मभूमी जमीन वाद:चंपत राय-अनिल मिश्रांचे भवितव्य संघाच्या 12 जुलैच्या बैठकीत ठरेल, श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या जमीन वाद प्रकरणात नाव

लखनऊएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १२ आणि १३ जुलैला चित्रकूटमध्ये महत्त्वाची बैठक होत आहे. तीत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि संघाच्या कोट्यातून त्यात सदस्य झालेले डाॅ. अनिल मिश्रा यांच्या भवितव्याचा निर्णय होऊ शकतो. सूत्रांनुसार, बैठकीत ट्रस्टच्या कामकाजाबाबत महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. मंदिर उभारणीसाठी जमीन खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपामुळे ट्रस्टच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. संघ त्यामुळे चिंतित आहे. ट्रस्ट निर्माण समितीच्या बैठकांत संघातर्फे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी आणि डाॅ. कृष्ण गोपाल नियमितपणे सहभागी होत आले आहेत.

विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष असलेले चंपत राय बुधवारी सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटण्यासाठी चित्रकूटला आले होते, असे सांगितले जात आहे. यादरम्यान सरसंघचालकांनी त्यांच्याशी जमीन खरेदीतील घोटाळ्याबाबत प्राथमिक चर्चा केली. चंपत राय गुरुवारी अयोध्येत परतले. ते १२ जुलैच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पुन्हा चित्रकूटला जाणार आहेत. सूत्रांनुसार, १३ जुलैला भागवत आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चंपत राय आणि मिश्रा यांची भूमिका नव्याने निश्चित होऊ शकते. सूत्रांच्या मते, जमीन खरेदी प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा मुद्दा आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्षासहित इतर विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.

ट्रस्टमध्ये सीईओची नियुक्ती शक्य
चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी असलेल्या ट्रस्टमध्ये सीएची नियुक्ती झालेली आहे. दररोजची कामे चंपत राय आणि मिश्रा पाहतात. कार्यालय आणि मंदिर उभारणी कामाच्या देखभालीचे काम स्वैच्छिक सेवा देणाऱ्यांकडून पाहिले जात आहे. सवैतनिक कार्यालय प्रभारीची नियुक्ती झालेली नाही. ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले, ‘आता मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तसेच इतर पदांच्या नियुक्तीचा निर्णय होऊ शकतो.’

बातम्या आणखी आहेत...