आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shriram Temple Bhumi Pujan Will Be The Ideal Of Goodwill; Invitation To Ansari Along With Sunni Waqf Board

अयोध्या राम मंदिर:सद्भावनेचे आदर्श ठरणार श्रीराम मंदिर भूमिपूजन; सुन्नी वक्फ बोर्डासह अन्सारींनाही निमंत्रण

विजय उपाध्याय | अयोध्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीरामलल्ला विराजमान झाले ‘त्या’ वादग्रस्त 2.77 एकर जमिनीचे मालक

अयोध्येत ५ ऑगस्ट होत असलेले श्रीराम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन सद्भावनेचा आदर्श ठरेल. सुप्रीम कोर्टात बाबरी मशिदीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी, सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर अहमद फारुखी आणि अयोध्येतील रहिवासी पद्मश्री मोहंमद शरीफ यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, मंदिर आंदोलनात आघाडीवर राहिलेले भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या उपस्थितीबद्दल साशंकता आहे. सूत्रांनुसार, कोरोनामुळे सावधगिरी म्हणून ते ऑनलाइन सहभागी होऊ शकतात. तर, बाबरी मशीद प्रकरणातील आरोपी व माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह, उमा भारती उपस्थित राहतील. योगगुरू रामदेव बाबा, सरसंघचालक मोहन भागवत, गायत्री परिवाराचे प्रणव पांड्या व माँ अमृतानंदमयीसह सर्व धर्मांतील प्रमुखांसह अयोध्या आंदोलनात मृत्यू पावलेल्या अनेक कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रण आहे.

भूमिपूजनाला व्यासपीठावर पंतप्रधानांसह पाच लोक असतील. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांचा समावेश आहे.

श्रीरामलल्ला विराजमान झाले ‘त्या’ वादग्रस्त २.७७ एकर जमिनीचे मालक

श्रीरामलल्ला विराजमान वर्षानुवर्षे वादात राहिलेल्या “त्या’ वादग्रस्त २.७७ एकर जमिनीचे सरकारी कागदपत्रानुसार मालक झाले. अयोध्या जिल्हा प्रशासनाने महसूल गट क्रमांक १५९ व १६० व नजूल गट क्रमांक ५८३ चे जमिनीचे मालक म्हणून ही नाेंद केली. महसुली भाषेत त्याला ‘अमलदरामद’ म्हणजे अधिकार देणे म्हणतात. या २.७७ एकर जमिनीसोबतच जन्मभूमी परिसरातील पूर्ण ७० एकर जमीन श्रीरामजन्म भूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची झाली. ती कागदपत्रात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र म्हणून नोंद करण्यात आली आहे.

रामलल्लांकडे २.८१ कोटींची एफडी, २३० ग्रॅम सोने, ५ किलो चांदीही...

केंद्राने ट्रस्टची स्थापना गेल्या ५ फेब्रुवारीला केली. त्याच दिवशी आयुक्तांनी ट्रस्ट सदस्य विमलेंद्र मोहन मिश्र यांना अयोध्या अॅक्टने अधिग्रहित भूमी, भवन व श्रीरामलल्ला विराजमानच्या बचत खात्यातील २.८१ कोटीची एफडी, ८.७५ लाखांपेक्षा जास्त रोकड, कोषागारातील २३०.४२ ग्रॅम सोने, ५०१९.९८ ग्रॅम चांदीही सोपवण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...