आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प. बंगाल:शुभेंदू अधिकारींनी तृणमूल सोडली, एका आमदाराचाही राजीनामा, अडकवले जाण्याची शुभेंदूंना भीती

कोलकाता/नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीआधी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) अडचणी वाढत चालल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बंगाल दौऱ्याआधी टीएमसीचे मोठे नेते शुभेंदू सरकार यांनी गुरुवारी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला, तर पंडावेश्वरहून टीएमसीचे आमदार आणि आसनसोल नगरपालिकेचे अध्यक्ष जितेंद्र तिवारी यांनी पद सोडले आहे. मात्र, शुभेंदू अधिकारी यांचा आमदारकीचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. सभापतींचे म्हणणे आहे की, मी राजीनामापत्र पाहिले असून ते नियमानुसार नाही. यामुळे त्यावर नंतर निर्णय घेतला जाईल.

शुभंेदू यांनी राज्यपाल जगदीप धनकड यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राजकीय निर्णय घेतल्याने मला अडकवले जाऊ शकते, अशी मला भीती आहे. बदला घेण्याच्या भीतीमुळे राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा. अधिकारी यांच्या पत्राचा हवाला देत राज्यपालांनी म्हटले आहे की, आवश्यक ती पावले टाकली जात आहेत.

शुभेंदू यांनी ममतांना सांगितले- सर्व पदे सोडतोय, राजीनामा मंजूर करा
शुभेंदू यांनी टीएमसी अध्यक्ष व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पक्षाचे सदस्यत्व व सर्व पदांचा राजीनामा पाठवून तो लगेच स्वीकारण्याची विनंती केली आहे. मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम मतदारसंघाचे आमदार शुभेंदू अधिकारी काही दिवसांपासून पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. त्यांनी बुधवारी सायंकाळी विधानसभा सचिवांकडे राजीनामा दिला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser